Uddhav Thackeray On Lok Sabha  Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election 2024 : ठाकरे गट बॅकफूटवर; लोकसभेच्या 'या' महत्त्वाच्या जागा शरद पवारांना सोडणार?

Uddhav Thackeray On Lok Sabha : आजच्या बैठकीत या मतदारसंघांसाठी आघाडीकडून उमेदवार निश्चित करण्याचा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता

Chetan Zadpe

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. उमेदवारांची निवड, मतांची जुळवाजुळवबाबत रणनीती आखली जात आहे. याच अनुषंगाने आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या लोकसभानिहाय मतदारसंघाच्या आढावा बैठका घेण्यावर भर दिला आहे. (Latest Marathi News)

या आधीही उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर रणनीतीबाबत चर्चा केली होती. आज पुन्हा एकदा कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा ठाकरे गटाकडून घेण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत या मतदारसंघांसाठी आघाडीकडून उमेदवार निश्चित करण्याचा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

शरद पवार गटाला जागा सोडणार ?

लोकसभा मतदारसंघाच्या आजच्या आढावा बैठकीत हातकणंगलेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडणार असल्याच्या तयारीत ठाकरे गट आहे, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. याबाबतची चर्चा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झाल्याची ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्याने माहिती दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही खासदारांनी सोडली ठाकरेंची साथ

हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक या दोन्ही विद्यमान खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे या जागी आता तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेताना ठाकरे गटाची दमछाक होत आहे. म्हणून ही जागा आता शरद पवार गटाला सोडण्याच्या तयारीत ठाकरे गट असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT