Jayant Patil News : दसऱ्याच्या मुहूर्तावर जयंत पाटलांचे सीमोल्लंघन; हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पहिली झलक

NCP Political News : जयंत पाटील यांनी शमी पूजन केल्यानंतर इचलकरंजीवासीयांनी सोनं लुटले.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले मतदारसंघात इंडिया आघाडीत उमेदवारीची चर्चा सुरू असताना माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी सीमाेल्लंघन करत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजीत लोकसभेच्या दृष्टीने पहिली झलक दिली आहे.

विजयादशमी दसऱ्याचे औचित्य साधून 15,000 जणांच्या साक्षीने राज्य सरकारसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पहिल्यांदाच जयंत पाटील(Jayant Patil) यांच्या उपस्थितीत इचलकरंजीत भव्य कार्यक्रम झाल्याने त्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.

Jayant Patil
Dasara Melava 2023 Speech : दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरेच ठरले भारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात श्रीराम सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने विजयादशमी दसऱ्यानिमित्ताने आयोजित रावण दहण सोहळा आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. हजारो इचलकरंजीवासीयांच्या साक्षीने परंपरेनुसार सोने लुटले व रावण दहन पार पडले. या वेळी माजी आमदार राजीव आवळे, प्रदेश सदस्य मदन कारंडे, माजी सभापती नितीन जांभळे, संदीप मुळीक आदी उपस्थित होते.(Dasara News)

जयंत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. महागाईच्या रूपाने जनतेवर या सरकारने राक्षस आणून बसवला आहे. याच महागाईचा राक्षस आम्ही आज दहन करत आहोत. ज्यांनी राष्ट्रवादीच्या विचारांची फारकत घेतली. त्यांच्याही रूपाच्या रावणाची आम्ही दहन करत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी शमी पूजन केल्यानंतर इचलकरंजीवासीयांनी सोनं लुटले.

दरम्यान, जयंत पाटील हे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या कार्यक्रमात इचलकरंजीत उपस्थित राहिल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची चर्चा शहरात रंगली आहे. हातकणंगले मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रतीक पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

जयंत पाटील यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावल्यानंतर पुत्र लढतीची शक्यता आणखी गडद झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच त्यांनी पेरणी केल्याची चर्चा लोकसभा मतदारसंघात आहे.

Jayant Patil
Azad Maidan Dasara Melava : महाराष्ट्राचा पहिला नालायक मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची नोंद, रामदास कदमांची जहरी टीका

प्रकाश आवाडे यांचा गड भेदण्याचा प्रयत्न

इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे हे भाजपच्या जास्त जवळचे आहेत. सध्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्या ठिकाणी भाजपने(BJP) देखील आपली तयारी सुरू ठेवली आहे. भाजपकडून प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ही चाल ओळखून जयंत पाटील यांनी आतापासूनच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात फिल्डिंग लावण्यासाठी सुरुवात केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Jayant Patil
CM Eknath Shinde News : भर स्टेजवर शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी दिला मराठा आरक्षणाचा शब्द; पण जरांगे पाटील म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com