Thane News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याला गडकरी रंगायतन दिले आहे. नाट्यगृह आम्ही दिले. मात्र, नाटक दुसरेच लोक करत आहेत, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन मध्ये झालेल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलत होते. काही लोकांना वाटते, ते म्हणजेच ठाणे आहे. मात्र, ठाणे हे खऱ्या शिवसेनेचे (Shivsena) आहे. बाजारात नकली माल, चायनीज माल येत असतो, असा चिमटा ठाकरेंनी शिंदेना लगावला. मी संकटांना संधी म्हणून पाहतो, असे ठाकरेही म्हणाले.
लढण्याच्या वेळी जे सोबत असतात, तेच असली सैनिक असतात. ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे, ते काय न्याय देणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मला म्हणतात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांसाठी काय केले. हे उत्तर भारतीयच सांगतील. जे काही करायचे होते, ते कोरोना काळात केले.
हिंदुत्व म्हणजे काय? मी काँग्रेसच्या (Congress) सोबत गेलो हो गोलो, उघड गेलो. रात्री जाऊन बैठका घेतल्या नाहीत. मी कधीच लाचार होणार नाही. मी माझ्या लोकांसमोर झुकायला तयार आहे इतरांसमोर नाही. आम्हला फक्त घंटा बडवणारा हिंदु नको आहे तर आतंकवाद्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. महाविकास आघाडीच्या सभेला सगळे लोक आले होते. त्या सभा झाल्यानंतर नकली हिंदुत्ववाद्यांनी गोमूत्र शिंपडले. काय कारण तेथे आलेले लोक काय हिंदु नव्हते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे सरकार धृतराष्ट्रासारखे आहे. मी राष्ट्रपतींना विचारतो, त्या काय करत आहेत. देशात महिलांवर अत्याचार होत आहेत, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आमच्याकडे राज्यपाल होते, त्यांना मणिपूरला पाठवा, असा हल्लाबोल ठाकरे यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर केला. विरोधी पक्षांना आम्ही विरोधक मानत नाही. ही सगळी देश भक्तांची आघाडी आहे.
आम्ही आघाडीला 'इंडिया' नाव ठेवले. आमच्या आघाडीच्या नावाची खिल्ली पंतप्रधांनांनी उडवली. 'इंडियन मुजाहिद्दीन'च्या नावाशी 'इंडिया'ला जोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जेव्हा परदेशात जातात तेव्हा 'इंडियाचे पंतप्रधान असे सांगितले जाते. काय इंडियन मुजाहिद्दीनचे पंतप्रधान आहेत, असे सांगितले जाते का? अशा शब्दांत ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या 'इंडिया' आघाडीवरुन केलेल्या टिकेचा समाचार घेतला.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.