PCMC News : भिडेगुरुजीविरोधात काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन तर संभाजी ब्रिगेडचा इशारा

Congress Pcmc News : कॉंग्रेसने भिडेंविरोधात तीव्र आंदोलन
Congress
CongressSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri-Chinchwad News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेगुरुजी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत अमरावती जिल्ह्यात नुकत्याच (ता.२७) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर उमटत आहेत. विरोधी पक्षांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे. पिंपरीतही कॉंग्रेसने भिडेंविरोधात तीव्र आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेला आज (ता.२९) जोडे मारून त्यांचा निषेध केला.

शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कॉंग्रेसने (Congress) हे आंदोलन केले. त्यात भिडेगुरुजींच्या अटकेची मागणी करण्यात आली. माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महिला अध्यक्षा सायली नढे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे आदी त्यात सामील झाले होते. यावेळी भिडेंच्या जोडीने मोदी-शहा आणि भाजप सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Congress
Narendra Modi News : पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याला विरोध; बाबा आढावांच्या नेतृत्वात २६ पक्ष, संघटना ऐकवटल्या

पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

भिडेंगुरूजींनी अमरावतीअगोदर पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad) असेच वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य गेल्या २५ जूनला दिघी येथे केले होते. 15 ऑगस्ट हा काळा दिवस आहे, जनगणमन हे आपले राष्ट्रगीत असू शकत नाही. तसेच तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज नाही,15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही. त्या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा, असे ते त्यावेळी बोलले होते. त्याबद्दल तक्रार करूनही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. म्हणून त्याविरोधात आता थेट पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

Congress
Mahesh Landge News : महेश लांडगेंचा हट्ट पंतप्रधान मोदी 'असा'च पूर्ण करणार!

दरम्यान, परवा (ता.२७) त्यांनी पुन्हा तसेच आक्षेपार्ह विधान अमरावतीत केल्याने संभाजी ब्रिगेड संतापली आहे. अशा वक्तव्यांवर त्यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्याने ते वारंवार ती करीत आहेत, असे या संघटनेचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सतीश काळे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. तसेच येत्या चार दिवसांत भिडेंवर गुन्हा दाखल झाला नाही, तर पोलीस आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल, अशा आशयाचे इशारा निवेदन पिंपरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना संभाजी बिग्रेडच्या वतीने देण्यात आले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.