Uddhav Thackeray and CM Shinde  Sarkarnama
मुंबई

Mumbra Shinde Vs Thackeray: मुंब्य्रात राजकारण तापलं; शिंदे-ठाकरे गट आमनेसामने, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Uddhav Thackeray Mumbra Visit : उद्धव ठाकरे मुंब्य्रातील शाखेला भेट देण्यासाठी रवाना

Ganesh Thombare

Thane News: ठाण्यातील मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आले होते. यानंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्धव ठाकरे शनिवारी स्वत: मुंब्य्रातील शाखेला भेट देण्यासाठी दाखल झाले आहेत.

या वेळी ते शिवसैनिकांशी चर्चा करणार असून, त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊतदेखील उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे येण्याआधीच ठाण्यात वातावरण तापलं आहे. त्यामुळे या शाखेवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे, तर ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांशी फोनद्वारे संपर्क साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपण शांततेत आपला पाहणी दौरा करावा, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या फोनवर संवाद साधत म्हटले आहे. या वेळी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलिस अलर्ट झाले आहेत.

उद्धव ठाकरे हे मुंब्रा येथे येणार असल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठंमोठे बॅनर लावले आहेत, तर दोन्ही गटांत वाद होऊ नये, यासाठी पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना मुंब्य्रामधील या शाखेच्या परिसरात येण्यास मनाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बुलडोझर फिरवण्यात आलेल्या शाखेला उद्धव ठाकरे भेट देतात का ? या भेटीदरम्यान ते काय बोलणार ? तसेच यानंतर ते माध्यमांशीदेखील संवाद साधणार आहेत, त्यामुळे ते नेमकी काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT