Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut targeted Rahul Narwekar : 'त्यांची बायकोही निकाल मान्य करणार नाही'; राऊतांचा नार्वेकरांवर पहिला वार

Avinash Chandane

Mumbai Political News :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जोरदार चिरफाड केली. या महापत्रकार परिषदेच्या (Uddhav Thackeray PC on Shiv Sena MLA Disqualification) सुरुवातीलाच संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांचा लवाद असा उल्लेख केला त्यानंतर यांच्या लवादाने दिलेला निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

लवाद राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena) मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्याच्या हातात दिली, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. एवढेच नाही तर राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात जागोजागी त्या लवादाच्या अंत्ययात्रा निघाल्या. यापूर्वी असे कधी घडले नव्हते, असा दावा केला.

या महापत्रकार परिषदेला 'जनता न्यायालय' असे नाव दिले होते. यावेळी आज न्यायमूर्तीच्या भूमिकेत महाराष्ट्रातील जनता आहे, असे संजय राऊत यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. शिवाय विधानसभा अध्यक्षांना लवाद म्हणा, असे आदित्य ठाकरेंनी सांगितल्याचेही सांगितले. त्यानंतर लवाद असा उल्लेख करत संजय राऊतांनी नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपले मुख्यमंत्री म्हणतात, कर नाही त्याला डर कसली. म्हणूनच डर नसल्याने हे जनता न्यायालय घेतले, असा दावा राऊतांनी केला. त्याचवेळी आम्ही इमानदारीने लढलो, तुम्ही बेईमानीने जिंकलात, असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर या न्यायालयात जनता जो निर्णय देईल तोच निकाल चार महिन्यांनतर होणाऱ्या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. कारण सत्या आमच्या बाजूने असताना सत्याचा खून झाला, असे राऊत यांनी पुन्हा सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT