Sandipan Bhumre News : शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवरच टक्केवारीचे आरोप ? भरसभेत घेतले भुमरेंचे नाव...

Chhatrapati Sambhajinagar Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी विरोधक म्हणून आरोप करणे समजू शकतो, परंतु...
Sandipan Bhumre On Court Decision News
Sandipan Bhumre On Court Decision NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : राज्यातील महायुती सरकारमध्ये फ्रंट सीटवर असलेल्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यांची चर्चा गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच कारणानी होत आहे. विशेषतः निधी वाटप किंवा विकासकामे देतांना पालकमंत्र्यांकडून टक्केवारी मागितली जाते, असे आरोप विशेषतः शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर सातत्याने होतांना दिसत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सांवत जेव्हा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा त्यांच्यावर शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी टक्केवारी घेऊन निधीचे वाटप केल्याचा आरोप केला होता.

ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी विरोधक म्हणून आरोप करणे समजू शकतो, परंतु शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांकडून तेव्हा सावंत यांच्यावर आरोप करण्यात आले होते. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांच्याच पक्षाच खासदार हेमंत पाटील यांनी टक्केवारीचा आरोप करत शिवीगाळ केली होती. या यादीत आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे(Sandipan Bhumare) यांचेही नाव जोडले गेले आहे.

Sandipan Bhumre On Court Decision News
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस ठरवणार व्यूहरचना

तसे भुमरेंवर झालेले हे आरोप नवे नाहीत, पण जिल्हा मजुर सहकारी निवडणूक प्रचारात एका सोसायटीच्या चेअरमनने थेट भुमरे यांच्या तोंडावरच ते 15 टक्के मागतात असा, जाहीर आरोप करत खळबळ उडवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मजूर संघाच्या निवडणूक प्रचाराचा नारळ दोन दिवसांपुर्वी खुलताबाद येथे फोडण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, अल्पसंख्याक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार, पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत प्रचार सभा घेण्यात आली.

या सभेत एका सोसायटी चेअरमनने आपल्या भाषणात अब्दुल सत्तार यांच्याकडे कैफियत मांडताना आम्हाला कोणीच विचारत नाही. कामही देत नाही, पालकमंत्री भुमरे यांच्याकडे काम मागायला गेलो तर ते 15 टक्के मागतात, असा थेट आरोप केला. आम्ही सत्तारांना सांगयाचे नाही तर कोणाला? असेही हा चेअरमन म्हणाला. भुमरे यांच्या तोंडावरच टक्केवारीचा आरोप झाल्याने ते चांगलेच संतापले. अब्दुल सत्तारांनीही (Abdul Sattar) संबंधित चेअरमनची समजूत काढत त्याला शांत केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, टक्केवारीचा आरोप केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि याची एकच चर्चा जिल्हाभरातही सुरू झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हाती आलेली ही संधी हेरली आणि हा व्हिडिओ आपल्या फेसबुकवरून शेअर केला. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर 15 टक्केवाले पालकमंत्री संदिपान भुमरेजी...संभाजीनगरच्या विकासासाठी दुरदृष्टी असलेला हुशार टक्केवारीशिवाय फाईल न हलवणारे नेते, अहो हे मी नाही म्हणत हे जनता म्हणतेय, असा टोला लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Sandipan Bhumre On Court Decision News
Jagan Mohan Vs Sharmila : ...अखेर काँग्रेसनं जगनमोहन यांच्याविरोधात बहिणीला उतरवलंच

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com