Uddhav Thackeray speaks during a candid 'Saamana' interview with Sanjay Raut, emphasizing the legacy of the Thackeray brand in Maharashtra politics Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Interview : ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न, पण हे काळाच्या ओघात येतात अन् जातात.."; 'सामना'च्या मुलाखतीतून ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray slams BJP in 'Saamana' interview : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी त्यांना निवडणूक आयोग, कोरोना काळातील काम आणि पक्षफुटी संदर्भात विविध प्रश्न विचारले.

Jagdish Patil

Uddhav Thackeray Interview : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी त्यांना निवडणूक आयोग, कोरोना काळातील काम आणि पक्षफुटी संदर्भात विविध प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपकडून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, "ठाकरे हा नुसता ब्रँड नाही. तर हा ब्रँड म्हणजे महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न काहींनी केला. पुसू इच्छिणारे पुसले गेले. अनेक आले, अनेक गेले. जनतेने त्यांना पुसून टाकले."

तर ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्रात अनेक लोक कामाला लागलेत हे खरं आहे. ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी अनेक बॅण्ड वाजताहेत. कारण त्यांना स्वतःशिवाय देशात कोणतंही अन्य नाव नको आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबर करायला लागलेत, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

त्यावर राऊतांनी प्रश्न विचारला की, 'देवा म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव?' त्याला उत्तर देताना जे कोणी असतील ते. अशा लोकांबद्दल काय बोलायचं? हे काळाच्या ओघात येतात आणि काळाच्या ओघात जातात, असं म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

शिवाय यावेळी त्यांनी ज्यांच्याकडे काहीच नाही, जे पोकळ आहेत, त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते हेच ठाकरे ब्रँडचं विशिष्ट्य आहे. ज्यांनी काही निर्माण केलं नाही, कधीही कोणत्याही क्षेत्रात आदर्श उभा केला नाही, मग भले त्यांना शंभर वर्षे झाली असतील त्यांनी आता ब्रँडची चोराचोरी सुरू केलीय.

आपणच कसे या ब्रँडचे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. लोक त्यांना भुलणार नाहीत, असं म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावरही हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT