Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray & Sharad Pawar : 'त्यांच्या'साठी परतीची दारे उघडे आहेत का? ठाकरे, पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला

Mahayuti Vs MVA : भाजपला 28 जागांपैकी 9 तर राष्ट्रावादीला पाच पैकी फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेनेना मात्र आपला स्कोअर मेन्टेन करत 15 पैकी 7 जागा जिंकल्या.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत महायुतीची धूळधाण झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून करण्यात आला.

यावर सोडून गेलेल्या लोकांना पुन्हा सामावून घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरेंनी गद्दारांना परतीचे दारे बंद आहेत. तर पवारांनी त्यांना पुन्हा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हणत विषय संपवला. ते महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या संयुक्तिक बैठकीत बोलत होते.

हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी बाहेर पडलो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आपल्या बंडाचे समर्थन करतात. तर विकासासाठी आपण सत्तेत सहभागी झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार सांगतात. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भरघोस यशासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचे बोलले जाते. लोकसभेचा निकालानंतर मात्र भाजपची ही योजना फोल झाल्याचे स्पष्ट झाले.

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी सोबत घेतल्याचा भाजपला फटका बसल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मासिकातून टीका करण्यात आली. तर भाजपसोबत गेल्याने अजितदादांचा Ajit Pawar पाठिंबा कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपला 28 जागांपैकी 9 तर राष्ट्रावादीला पाच पैकी फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेनेना मात्र आपला स्कोअर मेन्टेन करत 15 पैकी 7 जागा जिंकल्या.

महायुतीला लोकसभेत फक्त 17 तर महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. आघाडीचे यश पाहता सोडून गेलेले लोक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ठाकरे आणि पवार गटात येणार असल्याचे दावा संबंधित पक्षांतील नेत्यांनी केला. यावर छेडले असता उद्धव ठाकरे Uddhav Thackeray म्हणाले, गद्दारांना परतीचे दरवाजे बंद आहेत. तर शरद पवारांनी त्यांना पुन्हा सामावून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे उत्तर देत विषय संपवून टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT