Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Thackeray Group Dasara Melava : 'आमचं सरकार आल्यानंतर तुम्हालाही उलटं टांगू'; उद्धव ठाकरेंनी ठणकावलं

Uddhav Thackeray Shivsena Dasara Melava 2023 : ''आपलं सरकार येणार आणि आणणार म्हणजे आणणारच. त्रास देणं थांबवलं नाही तर...''

Ganesh Thombare

Mumbai Dasara Melava 2023 : शिवसेनेचा (ठाकरे गट) दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थावर पार पडला. या दसरा मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. या वेळी ठाकरेंनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत मोदी-शाहांनादेखील घेरलं.

शिवसेना आमदारांच्या सुनावणीसंदर्भात बोलताना ठाकरेंनी भाजपला थेट आव्हान देत "तुम्ही अपात्रतेचा निर्णय केव्हाही लावा. पण निवडणूक लावा, मग होऊन जाऊद्या. मोदी सत्तेत आल्यानंतर स्थैर्य येईल, असं वाटलं होतं, पण आता काय चाललंय आपण पाहत आहोत. कोणाचेही प्रश्न सुटले नाहीत, असेही ते म्हणाले.

कोरोना काळात माझं कुटुंब माजी जबाबदारी हे काम केल्यामुळे मी राज्याचा कुटुंब प्रमुख झालो, ज्याच्या मागे पुढे कोणी नाही, त्यांच्या हातात देश दिला तर त्याचा जर्मन देशा प्रमाणे होतो, असे म्हणत मोदींवर हल्लाबोल केला.

उद्या आपलं सरकार येणार आणि आणणार म्हणजे आणणारच. त्रास देत थांबवलं नाही तर आमचं सरकार आल्यानंतर तुम्हालाही उलटं टांगणार, असे म्हणत ठाकरेंनी भाजपला ठणकावलं.

राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्या आल्या मेट्रोची आणि बुलेट ट्रेनची जागा आपण सांभाळली होती, ती लगेच देऊन टाकली. बुलेट ट्रेन गद्दारांना सुरतला नेण्यासाठी सुरू करत आहेत, मुंबई तोडून दिल्लीच्या दरवाजात उभी करण्याचा डाव आहे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न झाला तर तुमचं सरकार जाळून टाकेन, असा दमही त्यांनी भरला.

मुंबई आता आर्थिक राजधानी आहे की नाही माहीत नाही. मुंबईच्या बाहेर सर्व नेण्याचा प्रयत्न केला तर हात जाळून टाकू. हिम्मत असेल तर पीएम फंडापासून काश्मीरपर्यंतची चौकशी होऊ द्या. आम्ही मुंबई वाचवल्याचा अभिमान बोलून दाखवत नाही, पण तुम्ही मुंबईची बदनामी करत आहात.

भाजपचे नेते थाळी वाजवायला सांगत होते तेव्हा आमचे सरकार फक्त पाच रुपयांत शिवभोजन थाळी देत होते, राज्यपाल मंदिर उघडायला सांगत होते, तेव्हा आम्ही गावागावांत आरोग्य मंदिर उभारत होतो, असेही ठाकरे दसरा मेळाव्यात बोलताना म्हणाले.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT