Sanjay Raut, Amit Shah, Narendra Modi Sarkarnama
मुंबई

NDA Vs INDIA Alliance: देशात आताच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या, तर कुणाची सत्ता येणार? ठाकरेंच्या नेत्यानं धक्कादायक 'सर्व्हे'च आणला समोर

Modi Government News: एकीकडे 12 वर्षांच्या सत्ताकालखंडात विरोधकांना वरचढ ठरण्याची फारशी संधी न दिलेल्या मोदी सरकारला पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन चांगलेच जड चाललं आहे. संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी सरकारला जेरीस आणलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: गेल्या 12 वर्षांपासून सत्तेत असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी, दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा यांसारख्या विविध मुद्द्यांवरुन बॅकफूटवर आहे. याचदरम्यान, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे नवा बॉम्ब टाकला आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी(ता.12 ऑगस्ट) एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आता खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी-शाह जाणार, ते नक्की जाणार, असल्याचं म्हणत भाजपला डिवचलं आहे.

संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये 'पोल ट्रॅकर'च्या सर्वेक्षणाची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. एकंदरीत या व्हिडीओमधून देशात आजमितीला लोकसभेची निवडणूक पार पडल्यास भाजपप्रणित एनडीएला मोठा फटका बसण्याची शक्यता 'पोल ट्रॅकर' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

पोल ट्रॅकरने 'मूड ऑफ इंडिया' या नावानं एक महत्त्वाचा सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे लोकसभेच्या 543 मतदारसंघात 3 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आला होता. 4 लाख 53 हजार इतकी आहे. या सर्वेक्षणानुसार सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपप्रणित एनडीए आघाडीला राम मंदिरातील घोटाळा आणि जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

'पोल ट्रॅकर'च्या मूड ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार, देशात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली तर सत्ताधारी भाजपप्रणित एनडीएला एकूण 40 टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधकांना या सर्व्हेनं मोठा दिलासा दिला आहे.

'पोल ट्रॅकर'च्या मूड ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला 44 टक्के मतदान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या सर्व्हेत त्यांना तब्बल 280 जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अन्य पक्षांना 16 टक्के मतं आणि लोकसभेच्या 23 जागांवर विजय मिळेल, असा पोल ट्रेकरनं त्यांच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

एकीकडे 12 वर्षांच्या सत्ताकालखंडात विरोधकांना वरचढ ठरण्याची फारशी संधी न दिलेल्या मोदी सरकारला पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन चांगलेच जड चाललं आहे. संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी सरकारला जेरीस आणलं आहे. विरोधकांच्या झंझावातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या काही दिवसांपासून अधिवेशन काळात संसदेच्या सभागृहात पाऊल ठेवलं नव्हतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT