Shivsena News: 'छत्रपती संभाजीनगरमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करा...', खासदार भुमरेमामांनी थेट अमित शहांनाच घातलं साकडं

Chhatrapati Sambhajinagar Airlines : शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी या पार्श्वभूमीवर दिल्लीत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी साकडे घातले.
Sandipan Bhumare  Shrikant Shinde Amit Shah
Sandipan Bhumare Shrikant Shinde Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ही सेवा उपलब्ध नसल्याने संभाजीनगरसह मराठवाड्यातील पर्यटन व्यवसाय, उद्योग क्षेत्रालाही मोठा फटका बसत आहे.

शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी या पार्श्वभूमीवर दिल्लीत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी साकडे घातले. लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत त्यांनी नुकतीच शाह यांची भेट घेतली. मराठवाड्यात संदीपान भुमरे हे एकमेव महायुतीचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीला यश मिळते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्याच्या औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर तातडीने ‘इमिग्रेशन चेकपोस्ट’ (ICP) घोषित करून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी संदिपान भूमरे यांनी अमित शहा यांच्याकडे केली.

यासंदर्भात गृहमंत्र्यांना पत्र देऊन छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांकडे केंद्र सरकारचे लक्ष भुमरे यांनी वेधण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचे प्रमुख आर्थिक, औद्योगिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र असून, अजंठा-वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा यांसारख्या ऐतिहासिक आणि जागतिक पर्यटनस्थळांमुळे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात.

Sandipan Bhumare  Shrikant Shinde Amit Shah
BJP Vs Congress: अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला कर्ज मंजूर: काँग्रेसचा थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; यशोमती ठाकूर म्हणाल्या, 'देवाभाऊ...'

मात्र, थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध नसल्याने विदेशी पर्यटक, उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना मुंबई अथवा दिल्लीमार्गे प्रवास करावा लागतो. छत्रपती संभाजीनगर परिसरात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, खाद्यप्रक्रिया यांसह विविध औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार होत असून विदेशी गुंतवणुकीलाही मोठी संधी निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत थेट आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क उपलब्ध झाल्यास उद्योग, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला मोठी गती मिळू शकते, असे खासदार भूमरे यांनी पत्रात नमूद केले आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असून ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून विमानतळाची पाहणी पूर्ण झाल्याचे खासदार भूमरे यांनी शहा यांच्या निदर्शनास आणून दिले.

Sandipan Bhumare  Shrikant Shinde Amit Shah
Union Cabinet Expansion 2026: दिल्लीत वेगवान घडामोडी! महाराष्ट्रातील बडा नेता अमित शाहांना भेटला; केंद्रीय मंत्रिमंडळात मिळणार संधी?

आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक असलेल्या विमान कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्ट (ICP) ची अधिकृत मंजुरी महत्त्वाची असून, ही मंजुरी प्रलंबित असल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

पर्यटनाला चालना मिळेल..

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास मराठवाड्यातील पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. अजंठा-वेरूळसह ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, पर्यटनाशी संबंधित हॉटेल, वाहतूक, मार्गदर्शक, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि सेवा क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

मराठवाड्यातील उद्योगांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेमुळे विदेशी गुंतवणूकदार, उद्योगपती, तज्ज्ञ आणि व्यावसायिकांना छत्रपती संभाजीनगरला येणे सुलभ होईल.

Sandipan Bhumare  Shrikant Shinde Amit Shah
Eknath Shinde : भेसळखोरांवर थेट मोक्का! एकनाथ शिंदेंचा तुकाराम मुंढेंना फ्री हँड; लीगल टीमही तयार होणार!

त्यामुळे नवीन गुंतवणूक आकर्षित होऊन स्थानिक उद्योगांच्या विस्ताराला चालना मिळण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास पर्यटन, उद्योग, व्यापार, गुंतवणूक, रोजगार आणि एकूणच मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला नवी झेप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com