Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray: कबूतरे, हत्तीण अन् कुत्र्यांसाठी लोकं रस्त्यावर उतरतात; पण पहलगाममध्ये...'; उद्धव ठाकरेंनी भाजपला धु धु धुतलं

Uddhav Thackeray Political News: उद्धव ठाकरेंनी ही बोगस जनता पार्टी आहे, मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या,असं आवाहन केलं आहे. हे सगळं असं चाललं आहे,पण प्रामाणिकपणे जर निवडणूक घेतली, तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाही, जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी यांचे ढोंग उघडे पाडले असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

Deepak Kulkarni

Mumbai News: शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जात असलेल्या उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्याची शक्यता आहे. तर महायुतीनेही विशेषत: भाजपनं ठाकरेंना धक्का देत मुंबई महापालिकेत सत्ता आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचदरम्यान,उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोठं विधान केलं आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी(ता.23)राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना भाजपवर शा‍ब्दिक हलल् चढवला.ते म्हणाले,कबुतरांसाठी लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात, तेच कुत्र्यांसाठीही होतं आणि हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरून लढा देतात. ही चांगली गोष्ट आहेच, माणुसकी पाहिजे, भूतदया पाहिजे असल्याचं ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

पण याचवेळी मग पहलगाममध्ये जेव्हा आपल्याच देशाचे निष्पाप नागरिक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या माता-भगिनींचं कूंकू पुसलं गेलं, तेव्हा ही भूतदया,हीच माणुसकी कुठे गेली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच पहलगामच्या घटनेला अजून 2-3 महीने झाले नसतानाच आपले पंतप्रधान म्हणतात की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग या गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक झालं का ?रक्त आणि क्रिकेट कसं चालतं ? अशी खोचक टिप्पणीही उद्धव ठाकरेंनी करत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, पाकिस्तासोबत तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी कशी देता ?आपल्या देशाची टीम ही पाकिस्तानविरुद्ध आता क्रिकेटचा सामना खेळणार,मग तुमचा गरम सिंदूर कुठे गेला ?या भाकडकथा का ?तिकडे सैनिकांनी शौर्य गाजवलं आणि इथे राजकारणी श्रेय घेतात. असं होतं तर मग शिष्टमंडळ परदेशात का पाठवलं ? असा संतप्त सवालही त्यांनी मोदी सरकारला विचारला.

एकेक खासदार घेतले आणि जगभर पाठवले,ऑपरेशन सिंदूरबद्दल, पाकिस्तानविरुद्ध, दहशतवादाविरुद्ध असलेल्या लढाईबद्दल सांगण्यासाठी ते नेते जगभरत गेले ना.ते शिष्टमंडळ गेलं खरं,पण एकही देश या लढ्यात आपल्यासोबत उभा आहे की नाही हे स्पष्ट नाही.पाकिस्तानच्याविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही,पण त्याच पाकिस्तानसोबत आता आपण क्रिकेट खेळणार आहोत.

ठाकरे म्हणाले, मोदी सरकार आता काय पुन्हा जगभरात शिष्टमंडळ पाठवणार का ? नाही नाही, आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं म्हणणं खोटं होतं, आता या शिष्टमंडळाचं म्हणणं खरं आहे. पाकिस्तान हा चांगल्या गुणांचा पुतळा आहे, आम्ही त्यांच्यासोबत आता क्रिकेट खेळत असल्याचं ऐकवणार का असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

देशापेक्षा तुम्हाला अमित शहांचा मुलगा, त्याच्यासाठी क्रिकेट खेळता का तुम्ही? तिकडे जे सैनिक शहीद झाले, ते नागरिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा जय शाह मोठा आहे का ? असा सडेतोड प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं ? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी ही बोगस जनता पार्टी आहे, मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या,असं आवाहन केलं आहे. हे सगळं असं चाललं आहे,पण प्रामाणिकपणे जर निवडणूक घेतली, तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाही, जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी यांचे ढोंग उघडे पाडले असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT