Vaibhav Naik : राणेंनी धाड टाकली, पोलिसांना दमही भरला? मात्र अवघ्या दोन तासात आरोपींची सुटका? ठाकरेंच्या शिलेदाराने फटकारलं

Vaibhav Naik criticizes Nitesh Rane : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरूवारी (ता.20) कणकवली शहरातील एका मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती. तर अवैध्य धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते.
Kanakavali matka raid, Vaibhav Naik And Nitesh Rane
Kanakavali matka raid, Vaibhav Naik And Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • कणकवलीत नितेश राणेंनी मटका अड्ड्यावर धाड टाकून १२ जणांवर गुन्हा दाखल केला होता.

  • आरोपी अवघ्या दोन तासांतच सुटल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.

  • नाईक यांनी कारवाई फक्त नाटक असून पोलीसही हयगय करत असल्याचा आरोप केला.

Sindhudurg News : गुरूवारी कणकवली शहरात पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका बुकीवर धडक धाड टाकत कारवाई केली होती. त्यावेळी त्यांनी थेट पोलिसांनाही सुनावले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. 22) पत्रकार परिषद घेत पोलिसांनाच खडेबोल सुनावत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. तसेच या प्रकरणात हयगय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल असा पवित्रा घेतला होता. तर आणखी दहा बेकायदेशीर धंदे आपल्या टार्गेटवर असल्याचे सांगितले होते. दरम्यान आधीच केलेल्या धडक कारवाईतून आरोपीच काही तासातच सुटल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी, जुगार अड्ड्यावर झालेल्या कारवाई महादेव रमाकांत घेवारी यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांना ताब्यात देखील घेण्यात आले होते. मात्र अवघ्या दोन तासांत त्यांनी सोडून देण्यातच कसे आले असा सवाल नाईक यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अवैध्य धंदे वाढले असून मटका, जुगार, दारूसह अमली पदार्थ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. कणकवलीत देखील मटका वाढला असून राजरोसपणे टपऱ्यांवर चिट्ट्या फाडल्या जात आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुवस्था आहे की नाही? मंत्री आणि सत्ताधारी काय करतात असा सवाल केला जात होता.

Kanakavali matka raid, Vaibhav Naik And Nitesh Rane
Vaibhav Naik : अनिल परब यांच्यानंतर आता वैभव नाईक रणांगणात, थेट राणे कुटुंबावर हल्लाबोल; म्हणाले, 'वाळू माफीया...'

अशातच मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वत: कणकवली बाजारपेठेतील मटका बुकीवर धाड टाकली. यानंतर त्यांनी पोलिसांनाही बोलावून घेतले. यावेळी बुकी मावल महादेव रमाकांत घेवारी यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करत ताब्यात घेण्यात आले होते. तसेच जवळपास 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र अवघ्या काही तासांच्या आत त्यांना सोडून देण्यात आले.

यामुळे आता जिल्ह्यातील वातावरण तापले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांनी पोलिसांसह मंत्री राणेंना सवाल केला आहे. नाईक यांनी, राणेंनी पोलिसांना बोलावून घेत शहरातील एका मटका बुकीवर धाड टाकली. काही रक्कम आणि काही जणांना ताब्यात घेत गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र अवघ्या दोन तासांत त्यांची सुटका कशी झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याआधी बघ्याची भूमिका घेणारे पालकमंत्र्यांनी थेट अवैध्य धंदेवाल्यांनवर कारवाईची भूमिका घेतली. हीच भूमिका आमच्या शिवसेनेची आहे. मात्र या प्रकरणात कडक कारवाई होणे अपेक्षीत होते. पण ती झालेली नाही. त्यामुळे आता ही कारवाई का करण्यात आली? याचा उद्देश नेमका काय होता? असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे आता पालकमंत्र्यांनी द्यावीत. तसेच असे आरोपी सुटू नयेत याची दक्षता घ्यावी.

पालकमंत्र्यांनी केलेल्या कारवाईतील आरोपी फक्त दोनच तासात सुटतात. यामुळे जनतेच्या मनात संशय निर्माण झाला आहे. त्या संशयाचे निरसन करून त्या आरोपींवर कारवाई व्हावी. अशी कारवाई पोलिसांनी पुन्हा पुन्हा करून अवैध धंदे बंद करावेत अशीही मागणी यावेळी वैभव नाईक यांनी केली आहे.

Kanakavali matka raid, Vaibhav Naik And Nitesh Rane
Vaibhav Naik : विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणात गुन्हा दाखल होताच माजी नगराध्यक्षासह मुलगा फरार! वैभव नाईक आक्रमक

FAQs :

प्र.१: नितेश राणेंनी कुठे धाड टाकली?
उ: कणकवली शहरातील मटका बुकीवर नितेश राणेंनी धाड टाकली.

प्र.२: वैभव नाईकांनी कोणता आरोप केला?
उ: आरोपी अवघ्या दोन तासांतच सुटल्याने धाड ही केवळ दिखावा असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्र.३: या धाडीत किती आरोपींवर गुन्हा दाखल झाला होता?
उ: एकूण १२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com