Jai Gujarat controversy : शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमोर 'जय गुजरात', अशी घोषणा केली. या घोषणेनंतर एकनाथ शिंदे प्रचंड 'बॅकफूट'वर गेले.
यानंतर उद्धव ठाकरेंनी 'जय गुजरात'ची घोषणा, उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी 'मी मुंबईकर'ची घोषणा दिल्याची आठवण करून देणारे व्हिडिओ समोर आणले गेले. उद्धव ठाकरेंनी आजच्या मुंबईतील (Mumbai) 'आवाज मराठी विजय' मेळाव्यात एकनाथ शिंदे यांची, या घोषणेवरून पुरती उतरवली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, " काल एक गद्दार म्हणाला, जय गुजरात. किती लाचारी करायची. आपला मालक आला म्हणून, त्याच्यासमोर 'जय गुजरात' म्हणणारा गद्दार, आपल्या बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल?" त्यामुळे आताच डोळे उघडा. नाहीतर कायमचे मिटतील. आता आलेली जागा जाणार असेल, तर स्वतःला मराठी आईची मुलं म्हणून नका, असा घणाघात देखील उद्धव ठाकरेंनी केला.
'तुम्ही आता 'जय श्रीराम' म्हणायला लागलात, पण 'जय जय रघुवीर समर्थ', ज्यांनी आम्हाला शिवकलं, त्या रामदास समर्थ यांनी आम्हाला रामाची भक्ती शिवकली. राजकारणातील हे व्यापारी आहेत. वापरा अन् फेका. काल एक गद्दार म्हणाला, 'जय गुजरात'! किती लाचारी करायची', असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंनी यावेळी 'पुष्पा' चित्रपटाची आठवण झाली. बघितला असेल तुम्ही, दाढीवरून हात फिरवत म्हणतो, 'झुकेगा नहीं साला', तसे हे गद्दार म्हणत आहे की, उठेगा नहीं साला. कुछ भी बोलो उठेगा नही. अरे कसा उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. यावर ठाकरेंनी मी विचार मी म्हणतोय. अरे विचार वैगेर मी म्हणतोय, असे पुन्हा ठासून सांगितले.
हिंदी भाषेचा सक्तीला विरोध करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? असा प्रश्न करताना, आपला मालक आला म्हणून, त्याच्यासमोर 'जय गुजरात' म्हणणारा, आपल्या बाळासाहेबांच्या विचारा पाईक असू शकेल? त्यामुळे आताच डोळे उघडा. नाहीतर कायमचे मिटतील. आता आलेली जागा जाणार असेल, तर स्वतःला मराठी आईची मुलं म्हणून नका, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला सतर्क केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.