Uddhav Thackeray On Narendra Modi & Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News: उध्दव ठाकरेंनी शरद पवारांचं पुण्यातलं भाषण कान देऊन ऐकलं आणि मोदींवर ढकललं

सरकारनामा ब्यूरो

Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुण्यातील पुरस्कार सोहळा अजूनही राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मणिपूर जळत असल्याकडे लक्ष वेधताना विरोधकांनी मोदींचा दौरा आणि त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्याला विरोध केला. कॉंग्रेस, शिवसेनेचा विरोध असूनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही मोदींसोबत स्टेजवर बसल्याने विरोधकांनी नाराजी मांडली आणि पवारांना सल्लाही दिला.

मात्र, कोणाचे न ऐकता पुरस्कार सोहळ्याला गेलेल्या पवारांच्या भाषणाचीही तेवढीच चर्चा झाली. ‘शिवरायांनी पहिला सर्जिकल स्टाइक’ आणि लोकमान्य टिळकांनी प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य दिले, ’’ या पवारांच्या भाषणातील मुद्दे मोदींवर असल्याचे चर्चा झाली. या दोन विधानांचा धागा पकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षपणे चिमटा काढला. पवारांचे हे भाषण ठाकरेंनी कान देऊन ऐकले आणि योग्यवेळी मोदींवर ढकलून मोकळे झाल्याचे ठाकरेंच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात बुधवारी हजेरी लावली. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एकत्र उपस्थितीवर थेट भाष्य केले. तेव्हाच पवारांच्या भाषणावर बोलले. भाषण बोलके असते, तसे पवारांच्या भाषणातले मुद्दे महत्वाचे होते असे सांगून पवारांच्या भाषणाचा संदर्भ मोदींशी जोडला.या निमित्ताने ठाकरेंनी शरद पवारांच्या भाषणातून मोदींवर टीकेचा बाण सोडला.

ठाकरे म्हणाले, भाषण हे नेहमी बोलकं असते. त्यामुळे शरद पवार(Sharad Pawar) यांनी कार्यक्रमात केलेलं भाषणातले मुद्दे बारकाईने लक्षात घ्यायला हवेत. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकसह इतर मुद्द्यांवर जे काही भाष्य केले ते महत्वाचे आहे. तसेच आता महाविकास आघाडीची आज होणाऱ्या बैठकीत इतर नेते त्याविषयी काय काय बोलतात हे पाहून आमची भूमिका स्पष्ट करेन असेही ठाकरेंनी यावेळी सांगितले.

संभाजी भिडेंवर सरकार बोलायला पाहिजे. ते जर भिडेंना गुरुजी मानत असतील तर त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार आहोत. ते सगळे बरोबर आहे असेच समजावे लागेल. पण गुरुजींनी विद्यार्थ्यांना चांगले धडे द्यावेत असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला.

मणिपूरमध्ये सरकार आहे की नाही असा सवाल उपस्थित करत उध्दव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यपाल महिला आहेत. तरी महिलांसोबत असे होत माझ्याकडे शब्द नाहीत तर मग डबल इंजिन सरकार आहे कुठे ? भाजप सरकार चालवू शकत नाही हे समोर आल आहे. महाराष्ट्रात पण सरकार नव्हता पण फोडाफोडी केली. भाजप राज्यकर्ते हॊऊ शकत नाहीत. महिलांचा आदर न करणे हे आमच्या हिंदु राष्ट्र आणि रामराज्यात बसत नाही.

शरद पवार काय म्हणाले होते..?

पवार म्हणाले, "देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांची लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायाची रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाचा घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असेही पवार म्हणाले होते.

देशाचा पहिला सर्जिकल स्टाईक

दरम्यान, देशात पुणे शहराचे वेगळं महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास पूर्ण जगाला माहित आहे.त्यांचा जन्म याच जिल्ह्यात, याच शहरात झाला. त्यांनी येथे आपले बालपण घालवले. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी शिवाजी महाराज लढले. त्यांनी भोसल्यांचे राज्य नव्हे तर हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य उभे केले. हा गौरवशाही इतिहासाचा भाग आहे. पुढच्या काळात या देशाच्या जवानांनी देशाचे रक्षण करण्यासाठी एक प्रकारचे सर्जिकल स्टाईक केले होते. त्याची चर्चा आता होते. देशाचा पहिला सर्जिकल स्टाइक शिवछत्रपतींच्या काळात झाला असे विधान करत पवारांनी मोदींवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT