Mumbra news :''मुंब्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, मर्द, लढव्या बंधू आणि मातांनो. आज संपूर्ण मुंब्रा रस्त्यावर उतरला आहे. कारण, गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यांना सत्तेचा माज आलेला आहे, त्यांनी बुलडोझर लावून शिवसेनेची शाखा पाडली. त्यांना खरा बुलडोझर काय असतो, तो बुलडोझर घेऊन मी आज मुंब्रामध्ये आलो आहे,'' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर मुंब्रामध्ये बोलताना घणाघात केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय ''या नेभळटांना मी एवढच सांगतोय, की तुमची जी मस्ती आहे आज सकाळी मला कळलं, की आपली पोस्टर्स त्यांनी फाडली. निवडणुका येऊद्या, मग आम्ही तुमची मस्ती फाडतो,'' असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
याचबरोबर ''कारण, त्यांनी शाखा चोरांचं रक्षण केलंय शाखेच्या मालकापासून आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, की प्रशासन किती हतबल झालेलं आहे. कारण आज जर इकडे तिकडे काही घडलं असतं, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. पण महाराष्ट्राची अब्रू या चोरांनी जे सत्तेची गादी भोगताय त्यांनी आधीच घालवलेली आहे,'' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
तसेच ''हा खरा वाद असूच शकत नाही, कारण सगळी कागदपत्रं आपल्याकडे आहेत. याचा निकाल लागत नाही तोपर्यंत एकतरी तिकडे ते डबडं असता कामा नये आणि माझ्या शिवसेनेची शाखा रोज तिकडे भरल्याशिवाय राहणार नाही. बघूया कोण तिकडे येतं. अरे नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल, तर पोलिस बाजूला ठेवा आणि या समोर,,॑' असं आव्हानही या वेळी उद्धव ठाकेरंनी दिलं.
''आज दिल्लीच्या कृपेने तुम्ही सत्तेवर बसलेले आहात. कटपुतली बाहुल्यांनो, तुमच्यात हिंमत नाही. मर्दपणा तर तुमच्या आसपासही फिरकत नाही. पण हे जे माझे मर्द इथे जमलेले आहेत, त्यांना जर तुम्ही पोलिसांचा धाक दाखवून घाबरवत असाल, तर मर्दाची औलाद असाल तर पोलिस बाजूला ठेवून या भिडा आम्हाला, आमची तयारी आहे. अगदी तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने तिकडे जाऊन उभा राहिलो. बघूयात कोणाची हिंमत आहे, अगदी केसाला जरी धक्का लागला, तरी यांचे सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही,'' असा इशाराही या वेळी उद्धव ठाकरेंनी दिला.
(Edited By - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.