Uddhav Thackeray, Ganpat Gaikwad  Sarkarnama
मुंबई

Kalyan Dombivli Politics : कोणी कितीही सभा घेवोत... ; कल्याणचा दौरा करणाऱ्या ठाकरेंना भाजप आमदाराचे आव्हान

Kalyan Bjp Mla Ganpat Gaikwad On Uddhav Thackeray : कल्याणमध्ये येऊन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजप आमदाराने दिले प्रत्युत्तर...

Bhagyashree Pradhan

Bjp vs Uddhav Thackeray In Kalyan East :

उद्धव ठाकरे शनिवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार निवडून येईल, असा दावा केला होता. यावरून आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

कोणी कितीही सभा घेवोत, या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येईल. कारण भाजपच्या युतीमध्ये जो कुणी उमेदवार असेल आणि पक्षश्रेष्ठी ज्यांना तिकीट देतील तोच उमेदवार या मतदारसंघात निवडून येणार असल्याचे प्रत्युत्तर Uddhav Thackeray यांना दिले.

'उद्घाटनावेळी डावलले जाते'

कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. भाजप आमदार गणपत गायकवाड व स्थानिक पदाधिकाऱ्याने अनेकदा शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली होती.

गणपत गायकवाड यांनी अनेकदा आक्रमकपणे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तरही दिले होते. त्यामुळे कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ नेत्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आजही धुसफूस कायम असल्याचे दिसून येते.

कल्याण पूर्व मतदारसंघात राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनात स्थानिक आमदार म्हणून आपल्याला डावलण्यात येत असल्याची खंत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केली. राज्य सरकारच्या निधीतून विकासकामाचे उद्घाटन होत असेल त्या ठिकाणी आमदारांचे नाव तिथे पाटीवर पाहिजे. मात्र जाणीवपूर्वक माझे नाव टाकले जात नसल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकारण अशा पद्धतीने चालत नाही. राज्य सरकारचा निधी येतो. त्यासाठी आमदारांचा पाठपुरावा असतो. त्यावर आमदारांचा अधिकार असतो. पण तिथे खासदार सुद्धा उद्घाटनला येत नाहीत. खासदारांचे कार्यकर्ते जाऊन उद्घाटन करतात. दबावामुळे संबंधित विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी उद्घाटनाला येत नाहीत. अशा उद्घाटनांमुळे मतदारसंघात चालढकल सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

'विकास कोणी थांबवला?'

कल्याण पूर्वेत वर्चस्व असल्याने डावलले जात असल्याची खंत आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली. माझं वर्चस्व आजही होतं कालही होतं आणि पुढेही राहणार. जोपर्यंत लोक मला आमदार म्हणून निवडून देतात तिथपर्यंत माझं वर्चस्व राहणार, असे ते म्हणाले.

मी विकास कामं थांबवली, अशी लोकांची दिशाभूल केली जाते. मात्र निवडणुकीच्या वेळेला विकास कामं कोणी थांबवली? याचे उत्तर देईल. कोणता एक माणूस उठून बोलत असेल तर त्याला मी उत्तर देणार नाही. मोठ्या नेत्यांनी बोललं तर नक्कीच उत्तर देईल, असा इशारा आमदार गणपत गायकवाड यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT