Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट; आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीसाठी...

Political News : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही आमच्याशी आलटून-पालटून लढले तरी आम्ही घाबरत नाही.
Aditya Thackeray, Shrikant Shinde
Aditya Thackeray, Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dombavali News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या गटातील वाद शिगेला पोहचला आहे. गेल्या काही दिवसापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडणूक लढविण्याचे आव्हान करीत पराभूत करण्याची भाषा वापरली जात आहे. डोंबवली मतदार संघाचा शनिवारी उद्धव ठाकरे यांनी दौरा करीत घराणेशाहीवर टीका केली. त्यामुळे त्यांच्याच भाषेत उत्तर देत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट करीत ठाकरेंच्या अडचणीत वाढ करताना निवडणूक लढविण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

वरळी मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांना मैदानात उतरविण्यात आले होते. त्यावेळेस दोन आमदारांचे तिकीट कापण्यात आले होते. आजही मंडळी आम्हालाच चोर म्हणत आहेत. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आलटून-पालटून आमच्याशी कोणीही लढा आम्ही घाबरत नाही, असे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

Aditya Thackeray, Shrikant Shinde
Loksabaha Election : मोठी बातमी! ...तर महायुतीला धक्का देत जानकर धरणार महाविकास आघाडीची वाट

राम मंदिराच्यानिमित्ताने सगळीकडे आनंद साजरा व्हावा, यासाठी आनंदाचा शिधावाटप करण्यात आला. या शिधावाटप कार्यक्रमानिमित्त ते डोंबिवली येथील नेमाडे गल्लीत आले असताना मीडियाशी बोलत होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचे स्वागत मी अगोदरच केले आहे. त्यांनी लोकसभा दौरा केल्यानंतर खऱ्या परिस्थितीची जाणीव त्यांना झाली असेल. हे त्यांनी पूर्वीच करणे अपेक्षित होते. पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळी जेव्हा यायचे तेव्हाची गर्दी आणि आताची गर्दी यांच्यातील फरक त्यांना कळला असेल. वाईट या गोष्टीचं वाटते, सर्व पक्ष एकत्र येऊनसुद्धा दोनशे ते तीनशे लोक जमू शकत नाहीत. या गोष्टीची त्यांना जाणीव झाली असेलच. गल्लोगल्ली त्या ठिकाणी फिरावे लागते.

नागरिकांना टोमण्यांचा कंटाळा आलाय

नागरिकांना तेच शब्द तेच टोमणे यांचा कंटाळा आला आहे. नागरिकांना काम हवे आहे, ते काम आम्ही करीत आहोत. त्यामुळे मतदार आमच्या बाजूनेच आहेत. पातळी सोडून भाष्य केलं जात आहे, आम्ही कधीही पातळी सोडून राजकारण केले नाही. आमच्यावर चांगले संस्कार आमच्या आई-बाबांनी केलेले आहेत. आमची प्रायव्हेट कंपनी नाही. आम्ही घराणेशाहीसारखे काम करीत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागरिकांना टोमण्यांचा कंटाळा आलाय

नागरिकांना तेच शब्द तेच टोमणे यांचा कंटाळा आला आहे. नागरिकांना काम हवे आहे, ते काम आम्ही करीत आहोत. त्यामुळे मतदार आमच्या बाजूनेच आहेत. पातळी सोडून भाष्य केलं जात आहे, आम्ही कधीही पातळी सोडून राजकारण केले नाही. आमच्यावर चांगले संस्कार आमच्या आई-बाबांनी केलेले आहेत. आमची प्रायव्हेट कंपनी नाही. आम्ही घराणेशाहीसारखे काम करीत नाही.

कल्याणमध्ये लढायला कोणी नव्हते, त्यावेळी आम्ही होतो

आमच्या पक्षात वेगवेगळे नेते आहेत. विविध नेते वेगवेगळी पदे भूषवित आहेत. ज्यावेळी कल्याण येथे लढायला कोणी नव्हते, त्यावेळी आम्ही होतो, असेही श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले.

(Edited by Sachin Waghmare)

R...

Aditya Thackeray, Shrikant Shinde
Dr. Shrikant Shinde : देर आये दुरुस्त आये..! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com