Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On ECI : ...मग आमच्यावरही कारवाई करू नका; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला आव्हान

Maharashtra Politics : घोषणांचा भूलभुलैय्या नको; शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारत काँग्रेसला धूळ चारली आहे. विरोधकांनी मात्र हा लोकांचा नाही तर इव्हीएमचा जनादेश असल्याची टीका केली. तसेच मध्य प्रदेशमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी रामल्लाच्या दर्शनाचे अमिष दाखवून मतांचा जोगवा मागितल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. 'आता आम्हीही देव आणि धर्माच्या नावाने मते मागू, त्यावेळी कारवाई करू नका,' असे थेट आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठकारेंनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

शिवसेनेच्या (ठाकरे गट) संपर्क कार्यालय 'शिवालया'च्या उदघाटनानंतर ठाकरेंनी भाजपवर टीका केली. तसेच निवडणूक आयोगाच्या कारभारावरही बोट ठेवले. पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. निवडणूक जिंकलेल्या पक्षाचे अभिनंदन. निवडणूक संपली तरी शेतकऱ्यांच्या दयनिय अवस्थेकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. तसेच प्रचारात झालेल्या विधानांबाबत निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचे उत्तरही आलेले नाही. देवाच्या, धर्माच्या नावाने मागितलेली मते हा गुन्हा ठरतो की नाही, असा प्रश्नही ठकारेंनी यावेळी उपस्थित केला आहे.

ठाकरे म्हणाले, 'अमित शहांनी मध्य प्रदेशातील जनतेला रामलल्लाच्या दर्शनाचे अमिष दाखवले होते. याबाबत निवडणूक आयोगाने लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदू, राम मंदिराचा विषय घेतला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. तसेच त्यांचा मतदानाचाही अधिकारी काढून घेतला होता. आता या नियमात काही बदल करण्यात आले आहे का,' असा रोखठोक प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नी उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशातील अमित शाह (Amit Shah) यांच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाला निवदेन पाठवून कारवाईची ठाकरेंनी केली होती. यावर ते म्हणाले, 'निवडणूक आयोगाने अद्यापही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता देवाच्या आणि धर्माच्या नावाने मते मागण्यास काही हरकत नाही ना! उत्तर मिळाले नाही तर यास आयोगाची मान्यता आहे, असे गृहित धरायचे का ? तसे असेल तर येणाऱ्या सर्व निवडणुकांत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया आणि हिंदुबाबत असलेली आमची मते उघडपणे मांडू. त्यावेळी मात्र आपल्याला कारवाई करता येणार नाही,' असा थेट इशाराही ठाकरेंनी निवडणूक आयोगास दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT