Mumbai News : आगामी २०२४ च्या लोकसभेसाठी (Loksabha Election) रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची आज (दि.२३ जून) पाटणा येथे बैठक काल पार पडली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. (Latest Marathi News)
दरम्यान, विरोधकांच्या या मेळ्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार प्रहार केला होता. सत्तेसाठी आणि परिवार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे हे पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या बाजूला जावून बसले, अशी टीका फडणवीसांनी होती, आता याच टिकेला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या या टीकेवर पलटवार करताना खासदार राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या शेजारी मेहबुबा मुफ्ती बसले म्हणून काल म्हणे, फडणवीसांनी आमच्यावर टीका केली. फडणवीसांना इतकंच सांगायचं आहे की, "काश्मीर हा हिंदूस्थानच्या भूमीचा अविभाज्य भाग आहे, हे लक्षात घ्या. बाकी, तुम्हाला स्वतःच मेहबुबा मुफ्तींबरोबर अडीच वर्ष सरकार चालवल्याचा अनुभव आहे. मेहबूबा मुफ्तींच्या सरकारमध्ये तुम्हीच सोबत होता. मुफ्ती यांच्या शपथविधीला तर स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते, त्यामुळे टीका करताना ती जरा जपून करा, असा सल्ला राऊतांनी फडणवीसांना दिली आहे.
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषेदेत म्हणाले होते, "अशा प्रकारे विरोधकांनी कितीही मेळावे केले, त्याचा काही परिणाम आमच्यावर होणार नाही. देशातील जनता ही पंतप्रधान मोदींसोबत आहेत. हे विरोधक परिवारवाद आणि पक्ष वाचवण्याकरता एकत्र आले आहेत. मात्र लोक मोदीजींना साथ देतील."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. सातत्याने मेहबूबा मुफ्तीच्या नावावर भारतीय जनता पक्षाला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे आता मेहबुबा मुफ्तीसोबत चाललेच आहेत. आता तर ते त्यांच्या बाजूला बसलेत. सत्तेकरता आणि परिवार वाचवण्याकरता, सगळ्या प्रकारचे तडजोड करण्यासाठी हे तयार झाले आहेत, पण याचा परिणाम होईल, असं वाटत नाही," अशा टीका त्यांनी ठाकरेंवर केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.