Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 6 खासदार शिंदे गटात जाणार, पक्षांतर बंदी कायद्याचाही अडसर येणार नाही?

Operation Tiger Shiv Sena : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. मात्र, शिंदेंच्या विजयामुळे साहजिकच ठाकरेंची शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या काही नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याची काळजी सतावत असल्याचं बोललं जात आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 07 Feb : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा (Shivsena) कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. मात्र, शिंदेंच्या विजयामुळे साहजिकच ठाकरेंची शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या काही नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्याची काळजी सतावत असल्याचं बोललं जात आहे.

त्यामुळे ठाकरे गटाचे नेते लवकरच उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकीकडे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता आहे तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) ऑपरेशन टायगरची तयारी सुरू करण्यात आली आहे. ऑपरेशन टारगर अंतर्गत ठाकरेंचे आणि काँग्रेसचे काही नेते आपल्याकडे खेचून आणण्यासाठी शिंदेसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.

पक्षांतर बंदी कायद्यामुळे ऑपरेशन टायगरला उशीर?

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच आता संसदेच्या अधिवेशनापूर्वी 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ठाकरेंचे काही खासदार शिंदे गटात येण्यास तयार होते.

मात्र, पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचायचं असेल तर ठाकरेंचे 9 पैकी किमान सहा खासदार फुटणं गरजेचं होतं. त्यामुळे 6 खासदारांचे मन वळवण्यात वेळ लागल्यामुळे ऑपरेशन टायगरला उशीर झाल्याचं बोललं जात आहे. तर खासदारांसह अनेक आमदार देखील एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण तरीही जर सुत्रांच्या माहितीप्रमाणे ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात गेले तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चर्चांवर आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT