Uddhav thackeray
Uddhav thackeray Sarkarnama
मुंबई

भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदेंना आव्हान

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एका अर्थी झाले ते बरे झाले आहे. सगळी बांडगुळे छाटली गेली आहेत. इतके दिवस ही बांडगुळे आपण आपल्या फांद्यांवर पोसत होतो. मात्र, त्यांच्या लक्षात आले नाही. बांडगुळांची मुळे फांद्यांमध्ये असतात. मात्र, फांद्यांची मुळे जमीनीत असतात. बांडगुळाला स्वत:ची ओळख नसते. तो सांगू शकत नाही की तो बांडगूळ आहे, असा हल्लाबोल शिवसेना (shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

अंगावर आता आलेले आहात, आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांना शिंगावर घ्यावे लागेल. प्रत्येक निवडणुकीत त्यांना पाणी पाजावे लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटे बघत मोठा झालो. आजही माझ्या हातात काही नाही. माझ्यासोबत चालायचे असेल, तर निखाऱ्यावर चालण्याची तयारी हवी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जसे मी माझ्या पित्याला वचन दिले होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच मी तुम्हाला वचन देतो. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या वणव्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी तुम्हाला तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, असेही ठाकरे म्हणाले.

ऑमाझे आव्हान आहे. एकाच व्यासपीठावर तुम्ही भाजपची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवा. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा घेतल्या. तेव्हा माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. तेव्हा कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझे उत्तर सांगितले नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीने मान-सन्मान देऊन आपली सोबत केली. सरकार झाले, तेव्हा अनेकांनी सांगितले की ते काँग्रेस बघा...काहीतरी गडबड करेल. शरद पवार तुम्हाला माहिती आहेत.. नीट लक्ष ठेवा... अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले.. मग गद्दार कोण, असा सवाल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT