Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

'आता मात्र अती झालं', उद्धव ठाकरे कडाडले

शिवसेनेचे (Shiv Sena) 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्रीपद ज्यांना पाहिजे होते, त्यांनी ते घेतले आहे. ज्यांना सर्वकाही दिले, ते गेले. मात्र, आपण काय बोललो नाही. आता अति होत असून, शिवसेना (ShivSena) प्रमुख व्हायला निघाले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टिका केली.

शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवरही निशाणा साधला.

शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी मने पेटवली. हिंदू अस्मिता जपली, तिचा घात करायला निघालेत. शिवसेना हे पवित्र नाव गोठवले गेले. या देशात हिंदू म्हणायची कुणाची हिंमत नव्हती, तेव्हा बाळासाहेबांनी ती दिली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ती हिंमत तुम्ही गोठवली, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

आपण तात्काळ तीन चिन्हा दिली आहेत. त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ही नावे दिलेली आहेत. चार दिवसामध्ये अर्ज भरण्याची वेळी आहे. त्यामुळे आम्हाला एक चिन्ह आणि नाव द्या, असी विनंती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. जनता जो निर्णय देईल तो मान्य असले, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT