Rajan Salvi Sunil Prabhu Manisha Kayande latest news Sheetal Mhatre  sarkarnama
मुंबई

म्हात्रेंच्या कार्यक्रमाला ठाकरेंचे तीन शिलेदार; साळवी, प्रभू, कायंदेंच्या मनात नेमकं काय ?

Sheetal Mhatre : ठाकरे गटातील काही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावरच नव्हे; तर थेट रश्मी ठाकरेंसह ‘मातोश्री’वर टीकेचे बाण सोडलेल्या शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावून ठाकरेंच्या तिघा शिलेदारांनी फोटोसेशन केले. या फोटोत आपल्यासोबत शीतल महात्रे असतील,याचीही काळजी या मंडळींनी घेतली आहे.

शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विधानसभेतील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह आमदार राजन साळवी आणि विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे( Manisha Kayande) या उपस्थित असल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटातील काही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता असल्याचे बोलले जाते. बाहेरून आलेल्या लोकांना मोठे केले जात असल्याची भावना यामागे असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका नेत्याने सांगितले.

प्रभू आणि साळवी हे शिवसेनेतून म्हणजे ठाकरेंपासून लांब होण्याची चर्चा असतानाच ते म्हात्रेंच्या कार्यक्रमात दिसल्याने ठाकरेंना दणका बसणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटाच्या प्रवकत्या शीतल म्हात्रे आणि त्यांचा भाऊ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट मजबूत करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण करण्यात माहीर असलयाचे मानले जाते. अशात आमदार प्रभू, साळवी आणि कायंदे यांच्यामुळे राजकारणाला नवीन वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

शिंदे गट आक्रमक झाल्यापासून सुनील प्रभू हे ‘बॅकफूट’ वर आले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष झडत असतानाही प्रभू हे तोंडावर बोट ठेवण्यापासून बैठकांनाही दांडी मारत असल्याची चर्चा आहे.दुसरीकडे नाणार प्रकल्प आणि कोकणातील विकास कामांच्या मुद्यांवरून साळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून असल्याचे अनेकदा बोलले गेले आहे. त्यामुळे हे नेते फूटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे यांचे प्रस्थ वाढल्याने कायंदे या काही प्रमाणात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच या तिघांनी शिंदे गटाच्या प्रवक्त्या म्हात्रे यांच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावून उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात असे काही झाले तर त्यामुळे ठाकरेंचा ताप वाढण्याचे संकेत आहेत. नव्याने आलेल्या लोकांना उपनेते, प्रवक्ते अशी पदे दिली जात आहेत, ही या अस्वस्थतेची प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT