Chandrakant Patil : चंद्रकांतदादांनी दिले मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना 'चॉकलेट'

चंद्रकांत पाटील यांच्या या अनोख्या कार्यशैलीची एकच चर्चा रंगली
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandrakant Patil News : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पुणे (Puns) शहरातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. कामाची पाहणी झाल्यानंतर त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना चॉकलेट वाटले. त्यांच्या या अनोख्या कार्यशैलीचे कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील हे नेहमी त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीला काहीतरी भेट दिल्याशिवाय जाऊ देत नाहीत असं सांगितलं जात. मात्र याचा प्रत्यक्ष अनुभव आज मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना आला.

पाटील हे पुण्याचे ( Pune) पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा ते घेत असतात. आजही ते पुणे शहरातील मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना चॉकलेट वाटले. या चॉकलेट वाटपामुळे मेट्रोच्या (Metro) कर्मचाऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगली होती.

Chandrakant Patil
Priya Pawar : काँग्रेसचे माजी आमदार नारायण पवारांच्या कन्येला भाजपने दिले थेट राज्याचे पद

मेट्रोच्या कर्मचाऱ्यांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ''मेट्रोचे कर्मचारी आणि अधिकारी हे २४ तास काम करत असातात. शहराच्या विकास कामामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते रात्रंदिवस मेट्रोचे काम करतात. त्यांना काम करत असताना प्रेरणा देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं'' त्यांनी सांगितलं. दरम्यान, मेट्रोच्या कर्मचाऱ्यांबाबत चंद्रकांतदादांच हे प्रेम पाहून कर्मचारीही भारावून गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com