Milind Narvekar, Narayan Rane sarkarnama
मुंबई

राणेंचे 'बाॅय'ला तत्परतेने उत्तर : सुशांतसिंगच्या मृत्यूची आठवण करून देत म्हणाले....

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेवरुन सुरु झालेला हा संघर्ष आता सुशांतसिंगच्या मृत्यू प्रकरणापर्यंत गेला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे मातोश्रीमध्ये बॉयचे काम करत असल्याचे म्हटले होते. त्यावरु राणे आणि नार्वेकर यांच्या ट्विटर वार रंगले आहे.

नार्वेकर यांनी ट्विट करत राणे यांना उत्तर दिले होते, ते म्हणाले होते ''बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचे विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?'' अशा शब्दात नार्वेकर यांनी राणेंना टोला लगावला होता. त्यानंतर लगेच राणे यांनी ट्विट करत नार्वेकर यांना आठवण करुन दिली.

राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की ''सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता. हे आपण विसरलात की काय? अश्या किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका'' असा स्पष्ट इशारा दिला. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूचे प्रकरण खुप गाजले होते. सुशांतसिंगची हत्या झाली असा आरोपही करण्यात आला होता. त्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मोठे राजकारण रंगले होते. त्या घटनेची आठवण काढत राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. त्यामुळे आता शिवसेना राणेंना काय उत्तर देते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नारायण राणे काय म्हणाले होते?

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे मोठे नेते आहेत. त्यावर राणे यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न करत हो? मिलिंद नार्वेकर का? ते तर पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचे काम करत होते. मी स्वत: पाहिले आहे. बेल मारली की ते हजर. काय पाहिजे साहेब?, असे विचारत असत. असे म्हणणारे आता नेते बनले आहेत. काय अपग्रेडेशन स्पिड आहे हो!, असे राणे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT