बॉय का? अच्छा! कॉलेजसाठी दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचे विसरलात?

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीके केली होती.
Milind Narvekar, Narayan Rane
Milind Narvekar, Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीके केली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा चांगलाच समाचार घेतला होता. मिलिंद नार्वेकर का? ते तर पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचे काम करत होते, असा टोला लगावला होता. त्यावरुन नार्वेकर यांनी राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

या संदर्भात मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचे विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?'' अशा शब्दात नार्वेकर यांनी राणेंना टोला लगावला आहे. राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या परवानगीसाठी राणे तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले होते. त्यानंतरच राणे यांचे महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग खुला झाला. त्या वेळी राणे यांना मिलिंद नार्वेकर यांच्याशीच संपर्क साधावा लागला होता. त्यासाठी राणेंनी दिवसभरात सात वेळा फोन करून नार्वेकरांशी बोलणे केले होते. या साऱ्या प्रसंगाची आठवण नार्वेकर यांनी या वेळी करून दिली आहे.

Milind Narvekar, Narayan Rane
संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचयं! उद्धव ठाकरेंच्या खुर्चीखाली सुरूंग पेरतायेत!

दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत आणि ताकतवान आहेत. त्यांचा कोणत्याही मंत्री पदावर डोळा नाही. राणेंनी आजवर फक्त खुर्चीसाठी बेईमानी केली आहे, असे सांगत राऊत यांनी राणे यांना चांगलेच धुतले.

हा आम्ही फक्त पहिला टप्पा दिला..राणेंचे असे अनेक टप्पे आहेत आम्ही ते वर्षभर देऊ शकतो, अशा इशाराही राऊत यांनी दिला. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या बाजूने आहे. चौकशीला घाबरून राणे यांनी लोटांगण घातले. मागच्या दाराने स्वत:चा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आम्ही सर्व शिवसेना खासदार किरीट सोमय्या यांनी राणेंवर जे आरोप केले त्याची चौकशी झाली का हे ईडी कार्यालयात जाऊन विचारणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. नितेश राणे यांनी देखील किरीट सोमय्या आणि लोढा यांच्यावर टीका केली होती. राऊत यांनी नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांची जुने व्हिडीओ काढत त्यांच्यावर निशाणा साधला.

Milind Narvekar, Narayan Rane
भाजपचा 'दिवा' विझला; शिवसेनेने अवघ्या १५ दिवसांत फोडले दोन अध्यक्ष

नारायण राणे काय म्हणाले होते?

शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे मोठे नेते आहेत. त्यावर राणे यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न करत हो? मिलिंद नार्वेकर का? ते तर पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचे काम करत होते. मी स्वत: पाहिले आहे. बेल मारली की ते हजर. काय पाहिजे साहेब?, असे विचारत असत. असे म्हणणारे आता नेते बनले आहेत. काय अपग्रेडेशन स्पिड आहे हो!, असे राणे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com