मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मोहित कुंभोजचा दाखला देत तो देवेंद्र फडणवीसांन बुडवणार, असे भाकित केले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पलटवार करत उद्धवजी संजय राऊत तुम्हाला बुडवतील, असा इशारा दिला. संजय राऊत (Sanjay Raut) हे शरद पवारांकडे पे रोलवर असल्यासारखे त्यांचा अजेंडा राबवत असल्याचा टोला देखील पाटील यांनी लगावला. (Uddhav Thackeray)
संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना व भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. यावर प्रसार माध्यमांशी बोलतांना पाटील यानी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. पाटील म्हणाले, कालच्या पत्रकार परिषदेत एकपात्री प्रयोग झाला, मग त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आल्या. आरोप झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन संपुर्ण पक्षाला वेठीस धरणे, शक्ती प्रदर्शन करणे, शिवसेना भवनाचा वापर करणे यातून एकच स्पष्ट होते की संजय राऊत घाबरलेत.
मुंबई बाॅम्बस्फोट प्रकणाचा तपास ईडीकडून सुरू आहे, अनिल देशमुखांच्या बाबतीत जेव्हा माजी पोलिसा आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपनंतर कारवाई झाली नाही, तेव्हा जयश्री पाटील कोर्टात गेल्या, सीबीय आली आणि मग त्यांना अटक झाली. आता काही नवीन गोष्टी समोर आल्या त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे ईडी आपल्या पद्धतीने काम करत असते.
संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली, त्यांच्या सीएचा, मुलींचा, पाटकर, प्रवीण राऊत यांची नावे समोर आली तेव्हा यांना जाग आली. यापुर्वी सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ठाकरे कुटुंबावर आरोप झाले, १९ बंगल्याचा विषय वर्षभरापुर्वीचा आहे, तेव्हा राऊत कधी बोलले नव्हते. पण स्वतःवर आले की त्यांनी सगळी शिवसेनाच दावणीला लावली. पण त्यांच्या पाठीशी कुणीच नाही हे काल दिसून आले.
आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेला का नव्हते? असा सवाल देखील पाटील यांनी केला. मोहित कुंभोजचे नाव घेवून हा माणूस देवेंद्र फडणवीस यांना बुडवणार, असा दावा देखील राऊत यांनी केला. यावर राऊत यांनी त्याची चिंता करू नये, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही समर्थ आहोत. पण उद्धवजी संजय राऊत तुम्हाला बुडवतील, असा चिमटा पाटील यांनी काढला.
संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरे यांना भरीस घातले, काही चुका झाल्या असतील पण मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व जुने मित्र सोडून जायला राऊत यांनीच भाग पाडले. राऊत हे पवार साहेबांकडे पे रोलवर असल्यासारखे त्यांचा अजेंडा राबवत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यावर थयथयाट करण्यापेक्षा मानहानीचा दावा दाखल करा, दाखल झालेला गुन्हा खारीज करण्यासाठी कोर्टात जा, असा सल्लाही पाटील यांनी राऊत यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.