Tahawwur Rana Sarkarnama
मुंबई

Tahawwur Rana : दहशतवादी तहव्वूर राणाला US न्यायालयाचा झटका; भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

US Supreme Court Tahawwur Rana extradition India Mumbai 26/11 terror attacks : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pradeep Pendhare

26/11 Terror Attack : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा दोषी तहव्वूर राणा याला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. त्याच्या भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात त्याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.

तहव्वूर राणा याने याचिकेत दावा केला होता की, पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने तिथे त्याचा छळ होईल. याचिकेत राणाने युक्तिवाद केला की भारतात खटल्याला सामोरे जाण्यासाठी त्याची जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे. यासाठी राणा यांनी त्यांच्या गंभीर आजारांसह अनेक कारणांचा हवाला दिला. पण अमेरिका न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली.

अमेरिका सर्वोच्च न्यायालयाने (Court), तव्वहूर राणा याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती दिली नाही, तर पुनर्विलोकन करता येणार नाही, असेही स्पष्ट केले. राणाने याचिकेत प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची आणि भारतात आत्मसमर्पण करण्याची मागणी केली होती. जानेवारीमध्येही सर्वोच्च न्यायालयाने राणा यांची पुनर्विलोकन याचिका फेटाळली होती.

याचिकेत राणा यांनी युक्तिवाद केला होता की, त्याचे भारताकडे (INDIA) प्रत्यार्पण हे अमेरिकेच्या कायद्याचे तसेच अत्याचाराबाबत संयुक्त राष्ट्रांच्या कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच भारताकडे प्रत्यार्पण केल्यास छळ होईल, असा दावा देखील केला होता.

राणा हा पाकिस्तानी वंशाचा 64 वर्षांचा कॅनडाचा नागरिक आहे. तो सध्या लॉस एंजेलिसमधील एका डिटेन्शन सेंटरमध्ये आहे. 26/11 चा हल्ला राणाने त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केला होता, असा आरोप आहे. हेडलीला दाऊद गिलानी या नावाने देखील ओळखले जाते.

राणाकडे अमेरिकन नागरिकत्व

राणा याची आई अमेरिकन आणि वडील पाकिस्तानी. हेडली हा मुंबई हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे, अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला ऑक्टोबर 2009 मध्ये अटक केली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील गेल्या महिन्यात मुंबईतील 26/11 हल्ल्यातील राणाच्या प्रत्यार्पणाला सकारात्मकता दर्शवत भारतात न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT