Vaman Mhatre Sarkarnama
मुंबई

Vaman Mhatre : म्हात्रेंचा खळबळजनक दावा; म्हणाले,'उद्धव ठाकरेंच्या गाडीवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बदलापूरात..'

Mayur Ratnaparkhe

Vaman Mhatre Controversial Statement News : बदलापूरात एका शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने, आज दिवसभर बदलापूरात नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. सकाळापासून ते संध्याकाळपर्यंत हजारो नागरिकांनी रेल्वे रूळावर ठिय्या धरला आणि आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी लावून धरली.

तर आंदोलकांना शांत करण्याचा सरकार आणि पोलिसांकडून प्रयत्न झाला परंतु त्याला यश न आल्याने अखेर पोलिसांनी लाठीमार सुरू केला व आंदोलन अधिकच चिघळले. वाहनांची तोडफोड झाली, तर आंदोलकांनीही पोलिसांवर दगडफेक केली.

या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकार धारेवर धरले आहे. शिवाय पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, एकीकडे हा सगळा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी एका माध्यम प्रतिनिधीलाच उलट प्रश्न विचारत, आक्षेपार्ह विधान केल्याचं समोर आलं आहे. एवढचं नाहीतर या जमावातील काही लोक हे उद्धव ठाकरेंच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आले होते, असंही ते म्हणाले आहेत.

बदलापूरातील गोंधळाच्या परिस्थितीत वार्तांकन करण्यास आलेल्या 'सकाळ'च्या महिला प्रतिनिधीस म्हात्रे यांनी 'तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे.' असं म्हणत उलट बोंबा ठोकल्या. एवढच नाहीतर 'बदलापूरला काही लोक हे बदला घेण्सासाठी आले होते. मुंब्रा चेंबूर या भागातून लोक आले होते. ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या गाडीवर जो हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी उबाठा गटाचे लोक आले होते.' असाही जावाई शोध लावला.

अशा गोंधळाच्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी या नात्याने जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा असते, मात्र म्हात्रे यांनी माध्यम प्रतिनिधीलाच उलट जाब विचारत, अपमानास्पद विधान केलं. शिवाय, यातही राजकीय आरोप करण्यास ते मागे राहिले नाहीत. यामुळे आता त्यांच्यावर टीकाही होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेत कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच गटाच्या पदाधिकाऱ्याने अशा संवेदनशील प्रकरणात महिला पत्रकाराला धमकी दिल्याचे त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT