(Video) Badlapur School Case : धक्कादायक! शिंदेंच्या शिवसेनेतील वामन म्हात्रेची मुजोरी; 'सकाळ'च्या महिला पत्रकाराला शिवीगाळ अन् धमकीही

Threat to female journalist covering Badlapur School Case : बदलापूर अत्याचार घटनेचे सुरवातीपासून वार्तांकन करणाऱ्या दैनिक 'सकाळ'च्या महिला पत्रकाराला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बदलापुरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे याने धमकी दिल्याचे तीव्र पडसाद उमटलेत
Waman Mhatre 1
Waman Mhatre 1Sarkarnama
Published on
Updated on

Badlapur School Case : बदलापूर अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना दैनिक 'सकाळ'च्या मुंबई आवृत्तील महिला बातमीदाराला शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी धमकी दिली आहे. 'तू अशा बातम्या देत आहे, जणू तुझ्यावर बलात्कार झाला आहे', अशा शब्दात माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी ही धमकी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेत कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सांगत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच गटाच्या पदाधिकाऱ्याने अशा संवेदनशील प्रकरणात महिला पत्रकाराला धमकी दिल्याचे त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन चार वर्षांच्या मुलींवर अत्याचाराचा प्रकार 13 ते 16 ऑगस्टला घडला. ही घटना उघडकीस आल्यानंतर 18 ऑगस्टला तिच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे (Police) धाव घेतली. या घटनेच्या निषेधासाठी बदलापुरमध्ये आज सकाळपासून पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. यानंतर आंदोलक आक्रमक होत बदलापूर रेल्वे स्थानकावर पोचले आणि 'रेल रोको' आंदोलन केले. त्यामुळे बदलापूर मार्गावरील सर्व रेल्वे सेवा विस्कळीत आहे. गेल्या आठ तासांपासून हे आंदोलन सुरू आहे. या घटनेची सुरवातीपासून वार्तांकन करण्यावर माध्यमांचा भर आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आंदोलनातील प्रत्येक क्षणाची माहिती पत्रकारांकडून दिली जात आहे.

Waman Mhatre 1
Badlapur Rape Case : "पीडित मुलींचे पालक 12 ते 18 तास वणवण फिरत होते..." बदलापूर प्रकरणावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

या घटनेचे पहिल्यापासून वार्तांकन करणाऱ्या 'सकाळ'च्या मुंबई बदलापूर आवृत्तीच्या महिला बातमीदाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील (Shiv Sena) माजी नगराध्यक्ष तथा शहरप्रमुख वामन म्हात्रे याने धमकी दिली. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावर बलात्कार झाला आहे, अशी भाषा वामन म्हात्रे याने महिला बातमीदाराशी बोलताना वापरली. वामन म्हात्रे याच्या या भाषेचे आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.

Waman Mhatre 1
Badlapur School Case : बदलापूर अत्याचाराच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; खटला जलदगतीने चालवण्याबरोबर राज्यातील शाळांना...

राजकारणाची पातळी घसरली : गडपाले

दैनिक 'सकाळ'च्या मुंबई आवृत्तीचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "हे कुठल्या प्रकारचे संवेदनशील नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकारावर 'सकाळ'च्या माध्यमातून वार्तांकन आमची महिला बातमीदार करत होती. या नेत्याने 'सकाळ'च्या या महिला बातमीदाराला रस्त्यावर अडवले आणि तू अशा काही बातम्या देत आहे की, तुझ्यावरच बलात्कार झाला आहे. इतर काही लोकं होती. एका महिला पत्रकाराला रस्त्यात अडवायचे. तिच्यावर टिप्पणी करायची. एकंदरच राजकारणाची पातळी खाली गेली आहे. अशापद्धतीने हे नेते वागत आहेत. वामन म्हात्रे याचा देखील शाळेशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. बातमीदारांना दमदाटी आणि धमकी देऊन हा प्रकार दाबण्याचा आहे, असे वाटते", असे राहुल गडपाले यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेणार

बदलापुरातील अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. यावर ते संवेदनशील देखील आहेत. घटना उघडकीस आल्यापासून आणि बदलापूरमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची ते बारकाईने माहिती घेत आहेत. ही माहिती घेण्याबरोबर ते प्रशासकीय यंत्रणेला कारवाईचे आदेश देत आहेत. मुख्यमंत्री शिंदे संवेदनशीलता दाखवत असतानाच, दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते मात्र या घटनेचे पहिल्यापासून वार्तांकन करत असलेल्या महिला बातमीदाराला रस्त्यात अडवून धमक्या देत आहेत. शिवसेनेतील नेत्याच्या या प्रकाराचे आता मुंबईत पडसाद उमटू लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com