Devendra Fadnavis Big Action In Badlapur Case: बदलापूर आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; फडणवीसांच्या गृह विभागाची मोठी कारवाई

Badlapur School Case Update : बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Badlapur News : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली होती.ही घटना समोर आल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी बदलापूर बंदची हाक दिली होती. सकाळपासून नागरिकांनी शाळेला घेराव घातला होता.याचवेळी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केलं आहे.

गेल्या आठ ते दहा तासांपासून बदलापूरमध्ये रेल्वे स्थानकांत आंदोलक आक्रमक झाले असून पोलिसांनी या घटनेत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असा आरोप आंदोलकांनी केलं आहे. याच आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत पोहचली असून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना मोठे आदेश दिले आहेत. बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी (SIT) ची स्थापन करुन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून आंदोलकांनी शाळा व पोलिसांवर दगडफेक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT) ची स्थापना केली आहे.

Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil : तुकाराम मुंढेंचे मोठे बंधू जरांगे पाटलांच्या भेटीला, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा

बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.

तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. तर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील हा खटला जलदगती कोर्टात चालवला जाईल. याचवेळी त्यांनी या खटल्यात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी पालकांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने गृहमंत्र्यांनी संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांची बदली केली. शाळेला नोटीस बजावली आहे. शाळेची जबाबदारी आहे. मुख्याध्यापिका अर्चना आठवले, वर्गशिक्षिका दीपाली देशपांडे, सहायक कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis
Raj Thackeray on Badlapur School Case : बदलापूर उद्रेकानंतर राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश; म्हणाले, कठोर शिक्षा होईपर्यंत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com