Education Minister Varsha Gaikwad Sarkarnama
मुंबई

Varsha Gaikwad News : वर्षा गायकवाड यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर!

Mumbai North-Central Lok Sabha Constituency : मागील काही दिवसांत वर्षा गायकवाड यांनी उमेदवारीसाठी दबावतंत्राचा अवलंब केल्याचे दिसून आले होते.

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून अखेर मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून वर्षा गायकवाड यांच्याकडून उमेदवारीसाठी दबावतंत्राचा अवलंब केला गेल्याचे दिसून आले होते.(Mumbai North-Central Lok Sabha Constituency)

महाविकास आघाडीतील जागा वाटपात, मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता. यामध्ये अखेर काँग्रेसने वर्षा गायकवाड(Varsha Gaikwad) यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीने जरी आपला उमेदवार जाहीर केला असला, तरी या मतदारसंघात अद्याप महायुतीकडून कोणालाही उमेदवारी जाहीर केली गेलेल नाही. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन या सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. मात्र त्यांच्याबाबतही अद्याप भाजपाने काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता वर्षा गायकवाड यांच्या विरोधात कोण याची सर्वांनाचा उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या नाराजीबाबात चर्चा सुरू होत्याे. मुंबई शहरातील लोकसभेच्या सहापैकी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या कमी जागांमुळे गायकवाड नाराज असल्याचं तेव्हा बोललं जात होतं. मात्र त्यानंतर आपण नाराज नाही आणि आपण नॉट रिचेबलही नव्हतो, असं स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले होतं.

मुंबईमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाची अनेक ठिकाणी संघटनात्मक ताकद चांगली आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन जागावाटप होणं गरजेचं होतं, असं वर्षा गायकवाडांनी तेव्हा म्हंटलं होतं. तसेच, मुंबईमध्ये मागील काळात आम्ही लोकसभेच्या (Lok Sabha) पाच जागा लढत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक जागा लढत होती. त्यामुळे आम्हाला बरोबरीची भूमिका मिळावी, अशी आमची इच्छा होती. असं वर्षा गायकवाड यांनी बोलून दाखवलं होतं.

दरम्यान, ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ वरून अनिल देसाई यांना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी टार्गेट केले. त्यावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल शेवाळे यांचे मोठे व्हिडीओ आहेत. ते देखील बाहेर यायला हवेत. त्यांचे दुबईतील व्हिडीओ फारच प्रसिद्ध आहेत. असा टोला वर्षा गायकवाड यांनी शेवाळेंना लगावला आहे. शेवाळे हे चेंबुरला बाबासाहेबांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी काय केले ते व्हिडीओ बाहेर आले पाहिजेत, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT