Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, शुक्रवारी मतदान होत आहे. मात्र, तरीदेखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील उमेदवारांचा घोळ संपलेला दिसून येत नाही. यात शिंदे शिवसेनेकडून मुंबईतील दक्षिण लोकसभा मतदारसंघात दिवसागणिक नवीन नाव चर्चेत येतं. पण अद्याप कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आत्तापर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,खासदार मिलिंद देवरा, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मनसेचे बाळा नांदगावकर यांची नावे आता मागे पडली आहेत.यात आता यामिनी जाधव यांच्या नावाची भर पडली आहे.
महायुतीत दक्षिण मुंबई लोकसभा हा मतदारसंघ शिंदे गटाला सोडला गेला आहे. पण अजूनही शिंदे गटाकडून या मतदारसंघासाठी अनेक उमेदवारांच्या नावांची चाचपणीच सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात फक्त संभाव्य नावांचीच चर्चा आहे .त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळते, ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांविरोधात शिंदे गटाकडून नेमकं लढणार तरी कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या यामिनी जाधव Yamini Jadhav यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी त्यांच्या पती यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती मिळाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून या नावांची चर्चा सुरू असून उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या नावाची चर्चा होती. आता यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत आले आहे. त्या शिवसेनेच्या भायखळाच्या आमदार आहेत.त्यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे फक्त नावांचीच चर्चा आहे. महायुतीचा उमेदवार अद्यापही येथे ठरत नाही. मात्र यशवंत जाधव यांनीही या मतदारसंघात आपला प्रचार सुरू ठेवला असल्याचे दिसते.
मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत Arvind Sawant यांना उमेदवारी दिली असून त्यांनी या मतदारसंघात आपला प्रचार जोरदार चालू केला आहे. गाठीभेटींचा धडाका सुरू आहे. त्यांच्यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही जोरदार प्रचार यंत्रणा या मतदारसंघात राबविली आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघात ताकद लावली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.