Varsha Gaikwad News : 'त्यांचे दुबईतील व्हिडिओ फारच प्रसिद्ध', राहुल शेवाळेंना वर्षा गायकवाड यांचा टोला

Rahul Shewale : शेवाळे हे चेंबुरला बाबासाहेबांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी काय केले ते व्हिडीओ बाहेर आले पाहिजेत, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Varsha Gaikwad Rahul Shewale
Varsha Gaikwad Rahul Shewalesarkarnama

Loksabha Election : ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ वरून अनिल देसाई यांना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी टार्गेट केले. त्यावरून काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल शेवाळे यांचे मोठे व्हिडीओ आहेत. ते देखील बाहेर यायला हवेत. त्यांचे दुबईतील व्हिडीओ फारच प्रसिद्ध आहेत. असा टोला वर्षा गायकवाड यांनी शेवाळेंना लगावला. शेवाळे हे चेंबुरला बाबासाहेबांच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा कार्यकर्त्यांनी काय केले ते व्हिडीओ बाहेर आले पाहिजेत, असे देखील वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Varsha Gaikwad Rahul Shewale
Lok Sabha Election 2024 : "चिन्हावर नव्हे, आम्ही आमच्या ताकदीवर जिंकून येऊ," हितेंद्र ठाकूरांना दृढ आत्मविश्वास

काँग्रेसमधून Congress शिंदे गटात गेलेले खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस दलित विरोध असल्यचा आरोप केला होता. वर्षा गायकवाड यांनी त्याला देखील प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस जर दलित विरोधी असते तर त्यांनी मला मुंबईचे अध्यक्षपद दिले असते का? आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील दलित आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिलिंद देवरा Milind Deora यांचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहिती आहेत. आता ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची भूमिका मांडावी. त्या पक्षाला सल्ले द्यावेत, अस सल्ला देखील वर्षा गायकवाड यांनी मिलिंद देवरा यांना दिला.

मिलिंदा देवरा हे काँग्रेसमध्ये असताना काही बोलले नाही. आता त्यांनी मोदींनी काय काम केले याच्यावर बोलावे. मुंबईसाठी केंद्राने काय केले हे बोलावे. 50 खोक्यांवर बोलावे. महापालिकेच्या निधीचे वाटप कसे केले यावर बोलावे, असा टोला देखील वर्षा गायकवाड यांनी लगावला.

Varsha Gaikwad Rahul Shewale
Lok Sabha Election 2024 : 'चार सौ पार'ची घोषणा भाजपसाठी ठरतेय 'इकडे आड तिकडे विहीर...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com