Officials announcing mayor reservation results at Mantralaya for Vasai Virar and Mira Bhayandar Municipal Corporations. sarkarnama
मुंबई

Mayor reservation : भाजपला रोखणाऱ्या वसई-विरार महापालिकेत 'ओपन'; उत्तर भारतीय महापौर बसवण्याचा इरादा असलेल्या मिरा-भाईंदरमध्ये येणार 'महिला'राज

Vasai Virar Mayor reservation : वसई विरार महापालिकेसाठी महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले असून मिरा भाईंदरमध्ये हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव जाहीर झाल्याने राजकीय चर्चा वेग घेत आहेत.

सरकारनामा ब्युरो

संदीप पंडित/प्रकाश लिमये :

Vasai Virar, Mira Bhayandar News : वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक होऊन आज महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले असून त्यात वसई विरार महानगर पालिकेसाठी खुला (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी जाहीर झाला आहे. त्यामुळे आता हितेंद्र ठाकूर आता कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ गळ्यात घालतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वसई विरार महानगरपालिकेचा कारभारी कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर होऊन वसई विरार साठी खुला प्रवर्ग (सर्वसाधारण) आरक्षण जाहीर करण्यात आल्यावर आता याठिकाणी महापौर कोण होणार यांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

बहुजन विकास आघाडीच्या विजयात 16 जागा निवडून आणणाऱ्या अजीव पाटील यांचे नाव यात सर्वात पुढे असून,त्यानंतर जेष्ठ नगरसेवक प्रफ्फुल साने,माजी महापौर प्रवीण शेट्टी. कन्हैया बेटा भोईर यांची ही नावे पुढे आहेत.

मिरा भाईंदर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी

मिरा भाईंदर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. 2002 पासून मिरा भाईंदर महापालिकेत आठ महापौर झाले आहेत. त्यातील सहावेळा महापौरपदी महिला बसल्या आहेत तर 2012 पासून सलग चारवेळा हे पद महिलांकडेच राहिले आहे. त्यावेळी कॅटलीन परेरा, गीता जैन, डिंपल मेहता व ज्योत्स्ना हसनाळे यांनी हे पद भूषवले आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 95 पैकी 51 नगरसेविका निवडून आल्या आहेत.

त्यामुळे महापालिकेत महिलांचाच वरचष्मा राहणार असे दिसत आहे. आता भाजपमध्ये सध्या शानु गोहिल, वंदना पाटील, डिंपल मेहता, दीपिका अरोरा, अनिता पाटील, वंदना भावसार या वरिष्ठ नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एखाद्या नावाचा विचार होऊ शकतो अथवा भाजप कडून धक्कातंत्रही अवलंबले जाऊन नवा चेहेराही दिला जाऊ शकतो. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मिरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर हवा अशी मागणी केली होती. त्यामुळे ते वादात सापडले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT