Vasai-Virar Mahapalika: भाजपच्या उधळलेल्या वारूला लगाम घालणारी एकमेव महापालिका... अजितदादा, ठाकरे बंधूंना न जमणारी गोष्ट ठाकूरांना जमणार?

Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadi: बहुजन विकास आघाडीची सर्वसामान्य नागरिकांशी असलेली जवळीक यामुळे बविआला यश मिळणार असे दिसते. भाजपचे तीन आमदार येथे असतानाही पक्षाच्या पदरी निराशा पडत असल्याचे दिसते.
Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadi
Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadisarkarnama
Published on
Updated on

Vasai-Virar Mahapalika 2026 Saam Tv Exit Poll: महापालिका निवडणुकीत वसई-विरारकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण येथे भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट लढत होती.

विधानसभा निवडणुकीत येथे भाजपने बहुजन विकास आघाडीचा सुपडा साफ केला होता. महापालिकेवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी भाजपने ताकद लावली होती. एक्झिट पोलचा अंदाजानुसार येथे बहुजन विकास आघाडी भाजपला धोबीपछाड मारणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ माध्यम समूहाने मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांचा सर्व्हे केला. यामध्ये कुणाची सत्ता येईल याचा अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

भाजपला 27, शिंदेसेनेला 5, काँग्रेसला 3, ठाकरेसेनेला 7 आणि बहुजन विकास आघाडीचे 72 नगरसेवक निवडून येतील, असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतो. बहुजन आघाडी येथे सत्तेत येऊ शकते, असे स्पष्ट दिसते. भाजपला विधानसभेत जे यश मिळाले होते, ते महापालिका निवडणुकीत मिळेल, असे दिसत नाही.

बहुजन विकास आघाडीची सर्वसामान्य नागरिकांशी असलेली जवळीक यामुळे बविआला यश मिळणार असे दिसते. भाजपचे तीन आमदार येथे असतानाही पक्षाच्या पदरी निराशा पडत असल्याचे दिसते. तर दुसरीकडे ठाकुर कुटुंबासाठी या एक्झिट पोल महत्वाचा आहे. कारण त्यांच्या दिशेने हा पोल आहे. भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

महायुतीतील घटक पक्षातील नाराजी उघड झाली होती. चौरंगी लढत येथे होईल, असे वाटत असताना येथे बविआ विरुद्ध भाजप असा दुहेरी लढत झाल्याचे दिसते. जनमतांच्या कौलनुसार बविआ 70 ते 75 जागांवर मुसंडी मारेल, हे स्पष्ट दिसत आहे. भाजप आणि शिंदेसेनेला 30 ते 40 जागांवर समाधान मानावे लागले. तर ठाकरे सेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 5 जागा मिळेल असा अंदाज आहे.

Vasai-Virar Mahapalika 2026 Bahujan Vikas Aghadi
Kolhapur News: प्रचार थांबल्यानंतर सोशल मीडियावर झळकलेले 66 उमेदवार अडचणीत; पोलीस-निवडणूक प्रशासनाचा दणका

वसई विरार महानगरपालिकेची स्थापना २०१० मध्ये झाली होती. पहिल्या निवडणुतीत सर्वात जास्त जागा मिळवून बहुजन विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळविली होती. त्यानंतर २०१५ ला झालेल्या दुसऱ्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०७ जागा निवडून रेकार्ड केला होता. यावेळी मात्र विधान सभेत झालेल्या सत्ता बदलानंतर बहुजन विकास आघाडी वसई विरार पालिकेवरील आपली पकड कायम ठेवण्याची चिन्ह आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com