pawanraje nimbalkar murder case sarkarnama
मुंबई

Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणी आजचा निकाल पुढे ढकलला; कोर्टानं नेमकं काय म्हटलं?

Pawanraje Nimbalkar Murder Case: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टात आज निकाल सुनावणा जाणार होता, त्यामुळ सर्व ९ आरोपींनी कोर्टात हजेरी लावली होती.

Amit Ujagare

Pawan RajeNimbalkar murder case: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टात आज निकाल सुनावणा जाणार होता, त्यामुळ सर्व ९ आरोपींनी कोर्टात हजेरी लावली होती. यावेळी पवन राजेनिंबाळकर यांचे पुत्र ओम राजेनिंबाळकर आणि कुटुंब देखील कोर्टात हजर झालं होतं. पण कोर्टाला निकाल सुनावण्यासाठी वेळ लागणार असल्यानं आणि वकिलांची पुरेशी उपस्थिती नसल्यानं याचा निकाल आता २० जून २०२६ रोजी सुनावण्यात येईल असं सीबीआय कोर्टानं सांगितलं.

कोर्टात नेमकं काय घडलं?

यापूर्वी मे महिन्यात या प्रकरणाचा निकाल सुनावला जाणार होता. त्यावेळी पद्मसिंह पाटील हे आजारी असल्यानं कोर्टानं निकालासाठी १६ जून २०२६ ही तारीख निश्चित केलीहोती. त्यामुळं आज सर्वच्या सर्व १९ आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर पवन राजेनिंबाळकर यांचे कुटुंबिय देखील कोर्टात हजर होते. यावेळी त्यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्याला कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रियाही दिली होती. पण कोर्टानं आज निकाल सुनावण्यास नकार दिला. कारण हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आणि निकाल वाचून दाखवण्यासाठी वेळ लागणार आहे, त्याचबरोबर कोर्टात दोन्ही बाजूंकडील वकिलांची पुरेशी हजेरी नसल्यानं कोर्टानं निकालासाठी २० जून ही तारीख निश्चित केली आहे.

काय आहे प्रकरण?

३ जून २००६ रोजी दुपारी नवी मुंबईच्या कळंबोली (मुंबई-पुणे महामार्गाजवळ) इथं धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील काँग्रेस नेते पवन राजेनिंबाळकर (भुपालसिंह निंबाळकर) आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी हे मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना त्यांच्या स्कोडा गाडीचा पाठलाग करून दोन हल्लेखोरांनी (मोटारसायकलवरून किंवा ओव्हरटेक करून) गोळीबार केला. दोघांनाही गोळ्या लागल्यानं घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हत्या करण्याचा आरोप आहे. सीबीआयने त्यांना मुख्य सुत्रधार म्हटलं आहे.

पवन राजेनिंबाळकर यांचा तत्कालीन उस्मानाबाद भागात वाढता राजकीय प्रभाव पाहून पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका वाटला, त्यातूनच हे हत्याकांड झालं, असा सीबीआयचा दावा आहे. २५-३० लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवल्याचंही सीबीआयनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. या हत्याकांडात इतर आरोपींमध्ये शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, पारसमल जैन, मोहन शुक्ला, कैलास यादव, सतीश मंदाडे, शशीकांत कुलकर्णी असे एकूण ९ आरोपी आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक उस्मानाबाद पोलिसांकडे होता. पण साक्षीदारांच्या फुटण्यामुळं मुंबई हायकोर्टानं २००८ मध्ये याचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर २००९ मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक झाली, त्यानंतर सध्या ते याप्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील साक्ष दिली होती. पवन राजेनिंबाळकर यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणात न्यायासाठी सातत्यानं पाठपुरावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT