Devendra Fadnavis | Election commissioner Sarkarnama
मुंबई

Vidhansabha Election 2024 : फडणवीस म्हणतात ‘महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची अन्‌ भक्कम जनादेशाची वाट बघतोय...’

Devendra Fadnavis' First Reaction : भाजपच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 मध्ये भरभरून यश दिले आहे, राज्यात संपूर्ण बहुमत दिले आहे. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 15 October : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली असून ‘विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय...’ असे आवाहन फडणवीस यांनी मतदारांना केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाच्या घोषणेचे स्वागत केले आहे. लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाशपर्व असेल आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू,असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजपच्या नेतृत्वात आपण 2014 आणि 2019 मध्ये भरभरून यश दिले आहे, राज्यात संपूर्ण बहुमत दिले आहे. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या (Mahayuti) विजयाचा जल्लोष करू या, अशा शब्दांत फडणवीस यांनी महायुतीला स्पष्ट बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय, असे सांगून सर्वांनी मतदान करावे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसा निवडणुकीची कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विधानसभेच्या 288 जागांसाठी आता एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार इच्छुकांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज 4 नोव्हेंबरपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी महिनाभराचा कालावधी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT