Vijay Wadettiwar Opposition Leader maharashtra news  Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar Opposition Leader: भुजबळ, फडणवीसांच्या तालमीत तयार झालेला मी पैलवान ..

Maharashtra Politics : वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी विठ्ठल वाघ यांची कविता वाचून दाखवली.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : विरोधी पक्षनेतेपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. "गरीब परिस्थितीतून मी इथपर्यंत आलो आहे. गरीब अन् सामान्यांच्या वेदना मी पाहिल्या आहेत. विरोधी पक्षनेतेपदावर असेपर्यंत मी इमानदार असेल," अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या.

"छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांचे काम मी पाहिले आहे. भुजबळ आणि फडणवीस यांच्या तालमीत तयार झालेला मी पैलवान आहे, सत्ताधाऱ्यांच्या बाजूला दोनशे आमदार असताना मला ही संधी मिळाली. माझ्या सहकाऱ्यांनी मला ही संधी दिली, त्यांचा मी आभारी आहे," असे वडेट्टीवार म्हणाले.

"मी लढणारा माणूस आहे. मला पुढे लढण्यासाठी आपण सर्वांनी या पदावर निवड करुन आणखी बळ दिले आहे. राजकारण एका मर्यादेपर्यंत केले पाहिजे. सध्या शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे ही आपली जबाबदारी आहे," असे सांगत वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी विठ्ठल वाघ यांची कविता वाचून दाखवली.

"आगामी निवडणुकीला १३ ते १४ महिने आहेत. लढायच्या वेळी विजय भाऊंना संधी मिळाली आहे. २०२४ मध्ये आमची सत्ता येणार, परंतु विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी हे तुमची टाळाटाळ करतील, अशी मिश्किल टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. "वडेट्टीवार वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाहीत," असे सांगत ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांना ठाकरेंना टोला लगावला.

"विरोधीपक्षनेता पॉवरफूल असावा लागतो. राज्याला चांगला विरोधीपक्षनेता लाभला आहे, विरोधीपक्षनेता हा भावी मुख्यमंत्री असतो. काल जे विरोधीपक्षनेते होते ते मुख्यमंत्री झाले आहेत," असे शिंदे म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT