Eknath Shinde, Vinayak Raut Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : महायुतीत मोठा स्फोट होणार! पवार कुटुंब एकत्र आल्याने विनायक राऊतांचं मोठं भाकीत

Vinayak Raut on Shinde Gat and Ajit Pawar Group : राज्यातील राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे...

Sachin Fulpagare

Mahayuti Government News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यामुळे पवार कुटुंबातही फूट पडल्याची चर्चा होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं चित्र आहे. आजारातून बरे झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवाळीनिमित्त पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले, पण अजितदादा हे पवार कुटुंबासोबत दिसून आल्याने राजकीय फटाके मात्र फुटत आहेत. अजितदादांच्या भूमिकेवरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी मोठं भाकीत केलं आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरच्या आता या प्रकरणी सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही सूचक वक्तव्य केलं आहे. ते फटाके फुटायला अजून वेळ आहे, असं नार्वेकर म्हणाले.

एकीकडे आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होत असताना दुसरीकडे महायुतीत सहभागी असलेला अजित पवार गट विकास निधी वाटपावरून नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच शरद पवार आणि अजित पवारांची पुण्यात भेट झाल्यानंतर पवार कुटुंब एकच असल्याचा संदेश दिला गेला आहे. दिवाळीच्या निमित्ताने अजितदादा आणि शरद पवारांची आतापर्यंत तीन वेळा भेट झाली आहे. यामुळे राजकीय चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर २१ तारखेला अजित पवार गटाची बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार काय भूमिका घेतात? याची उत्सुकता आहे.

काय म्हणाले विनायक राऊत?

अशा घडामोडी घडत असताना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ईडीच्या दबावामुळे शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे राज्यातील सत्तेत सहभागी झाले आहेत, असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. यासोबत डिसेंबरमध्ये मोठा राजकीय स्फोट होईल, असं ते म्हणालेत.

काहीही झालं तरी तीन तिघाडा आणि काम बिघाडा, असं म्हटलं जातं. शिंदे गट आणि अजितदादा गट हे मनापासून सत्तेत गेलेले नाहीत, तर ईडीच्या दबावापोटी गेले आहेत. भाजपची सत्तेची हाव आहे ती खूप मोठी आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली. आपलंच घोडं रेटण्याचं काम भाजप करेल. आणि नक्कीच यांच्यात स्फोट होईल. हा स्फोट ३१ डिसेंबरच्या आसपास होईल, असं भाकीत विनायक राऊत यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT