Vinod Tawade News Sarkarnama
मुंबई

Vinod Tawade News : पूनम महाजनांसाठी पक्षाने काहीतरी वेगळं...; तावडेंनी दिले मोठे संकेत!

Vinod Tawade Statement on Poonam Mahajan : विधानसभा 2019 मध्ये भाजपने मला देखील उमेदवारी नाकारली होती. यामागे पक्षाने काहीतरी वेगळा निर्णय माझ्याबाबतीत केला होता, तावडेंनी दिले मोठे संकेत.

Pradeep Pendhare

Mumbai Political News : भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाज (Poonam Mahajan) यांना दावेदारीतून डावलले. यावरुुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावर भाजपला डिवचले असताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी बाजू सावरली. 'पूनम महाजन यांच्या भवितव्यासाठी पक्षाने वेगळा निर्णय केला असावा', असे विनोद तावडेंनी म्हटले आहे. (Poonam Mahajan Latest Marathi News)

भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना डावलून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. प्रमोद महाजन यांनी भाजपसाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. यातच त्यांच्या मुलीचे तिकीट भाजपने कापल्याने महाजन परिवाराविषयी भाजपच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यावरून भाजपला डिवचले आहे. प्रमोद महाजन असते, तर ते आज पंतप्रधान असते. नरेंद्र मोदी यांचा उदय झाला नसता. दुर्दैवानं याच भाजपने महाजनांची कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारली, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले आहे. (Lok Sabhha Election 2024)

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी यावर खुबीने बाजू सावरली आहे. भाजपने पूनम यांच्या भवितव्यासाठी वेगळा विचार केला असावा, असे सांगून 2019 मध्ये त्यांना नाकारण्यात आलेल्या उमेदवारीची आठवण करून दिली. विधानसभा 2019 मध्ये भाजपने मला देखील उमेदवारी नाकारली होती. यामागे पक्षाने काहीतरी वेगळा निर्णय माझ्याबाबतीत केला होता. पुढे मला राष्ट्रीय सरचिटणीस पदावर संधी मिळाली. त्या संधीचे सोनं मी करून दाखवले. पक्षाने दिलेल्या जबाबदारीत मी सिद्ध ठरलो, असे विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सांगितले.

भाजपचे सदस्य नसलेल्यांना उमेदवारी दिली गेल्याच्या कारणांवर विनोद तावडे म्हणाले, ज्यांना उमेदवारी पक्षाने देवू केली होती, त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. आशिष शेलार (Ashish Shelar) यांना विचारणा केली होती. परंतु त्यांनी राज्याच्या राजकारणात अजून शिकायचे आहे, असे सांगितले. काही दिवस राज्याच्या राजकारणात राहून ते पुढे राष्ट्रीय राजकारणात येऊ शकतात, असेही विनोद तावडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT