Atul Londhe, Navneet Rana, Chandrashekhar Bawankule
Atul Londhe, Navneet Rana, Chandrashekhar Bawankule sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : बावनकुळेंकडून आचारसंहितेचा भंग; अतुल लोंढेंची आयोगाकडे तक्रार

सरकारनामा ब्यूरों

Mumbai Congress News : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून, निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागलेला नाही, असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागल्याचा दावा करून न्यायालयाचा अवमान केला आहे. हा गंभीर गुन्हा असून, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले की, २८ मार्च २०२४ रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सर्वोच्च न्यायालयाने खासदार नवनीन राणा प्रकरणी निर्णय दिलेला आहे.

अशा प्रकारचा चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा दावा केला आहे. अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करून खोटी माहिती पसरवली जात आहे, हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकणारा आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून, भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाल्या. अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने २०२१ मध्ये रद्द ठरवत दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २८ फेब्रुवारी २०२४ च्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे. असे असतानाही बावनकुळे यांनी निकाल लागलेला आहे, असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT