Raj Thackeray sarkarnama
मुंबई

Virendra Tandel Resign : राज ठाकरेंना धक्क्यावर धक्के, संतोष धुरीनंतर आणखी एका शिलेदाराचा 'जय महाराष्ट्र', मनसेवर गंभीर आरोप

MNS BMC Election : मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्या नंतर पक्षाला आणखी एक धक्का बसला असून माहीम प्रभागातील माजी नगरसेवकाने राजीनामा दिला आहे.

Roshan More

MNS News : मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र येऊन लढत आहेत. मात्र, जागा वाटपात आपल्या हवी असलेली जागा न सुटल्याने मनसेतील काही पदाधिकारी, माजी नगरसेवक नाराज आहेत. या नाराजीची ठिणगी संतोष धुरींच्या निमित्ताने पडली. धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. दादरमध्ये मनसेला धक्का बसल्यानंतर आणखी एका नेत्याने राज ठाकरेंची साथ सोडली आहे.

मनसेची माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राज ठाकरेंची साथ सोडली आहे. तांडेल यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला संघटनात्मक पातळीवर अपमानास्पद वागणूक मिळाली, असे ते म्हणाले.

पक्षाची विचारधारा ही व्यवस्थापनात दिसत नाही. पक्षात एकजुट आणि संघभावनेचा अभाव आहे, असा आरोप देखील त्यांनी केला असून राज ठाकरेंना पत्र लिहून आपला राजीनामा दिला.

वीरेद्र तांडेल यांनी माहीम प्रभाग क्रमांक 190 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही.

मनसेला सात जागाही मिळणार नाहीत...

संतोष धुरी यांनी पक्ष सोडताना जोरदार टीका केली. ते म्हणाले, मनसेला 52 जागा मिळाल्या. जेथे पक्षाची संघटनात्मक ताकद होती तेथे जागा मिळाल्या नाहीत. जिथे मराठी मतांची टक्केवारी जास्त आहे तेथे केवळ दोन ऐवजी एकच जागा मिळाली. मनसेने उद्धव ठाकरेंच्या पक्षासमोर शरणागती पत्कारली. पक्षाच्या सात ते आठ जागा येतील याबद्दल ही शंका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT