Mahapalika Election: पुणे महापालिका निवडणुकीत 20 जणांवर पोलिसांचा स्पेशल सर्व्हिलन्स : आयुक्तांनी CM फडणवीसांकडे सोपवली यादी; कोणाकोणाचे नाव?

PMC Election 2026 Criminal Candidates: पुणे पोलिसांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी करण्यात आलेल्या पडताळणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अडीच हजार इच्छुकांपैकी १५४५ जणांवर वेगवेगळे गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले.
PMC Election 2026 Criminal Candidates
PMC Election 2026 Criminal CandidatesSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सोबतच गुन्हेगारी मुद्दा ठळकपणे चर्चेला जात आहे. प्रमुख पक्षांकडून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या गुंडांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट तिकीट दिल्याने गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

त्यामुळे पुणे पोलिसांनी अॅक्टिव्ह गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या सुमारे २० उमेदवारांची यादी तयार केली आहे. ही यादी थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. या उमेदवारांवर विशेष नजर ठेवून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे पोलिस सतर्क आहेत.

पुणे पोलिसांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी करण्यात आलेल्या पडताळणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अडीच हजार इच्छुकांपैकी १५४५ जणांवर वेगवेगळे गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यात राजकीय गुन्हे सर्वाधिक असल्याचे सांगितले जात असले तरी, वास्तविक काही गंभीर गुन्हे नोंद असलेले देखील अनेकजण उमेदवार असल्याचे दिसून आले आहे.

त्याहून गंभीर म्हणजे, काही कुख्यात गुन्हेगारांचे नातेवाईक थेट प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्यावरून आरोप-प्रत्यारोप देखील झाले. पण, लढतीमुळे का'पुण्यातील गुन्हेगारी कमी कशी होणार?' असा प्रश्न पडला आहे.

पोलिसांच्या गुप्त माहिती आणि पडताळणीतून सध्या २० सराईत गुन्हेगार निवडणूक रिंगणात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण विविध प्रकारच्या गुन्ह्यांतील आहेत. निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पुणे पोलिसांनी या २० जणांवर करडी नजर ठेवली आहे.

त्या उमेदवारांकडून मतदारांवर दबाव, दहशत निर्माण करणे, पैशांचा गैरवापर, समाजमाध्यमांवरून अफवा पसरवणे किंवा विरोधकांना धमकावणे अशा कोणत्याही हालचाली होऊ नयेत, यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

संशयित उमेदवारांच्या हालचालीची दररोज नोंद ठेवली जात आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, बैठका, सोशल मीडिया पोस्ट्स आणि प्रचार पद्धतींवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. गरज भासल्यास कारवाई, प्रतिबंधात्मक तडीपारी, नोटिसा आणि आचारसंहितेअंतर्गत कठोर पावले उचलण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

PMC Election 2026 Criminal Candidates
Mahapalika Nivadnuk: सतेज पाटलांनी सांगितला महापौरांचा कालावधी; कोल्हापुरात काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध

यादीत कोणा कोणाची नावे

या यादीत मुख्यत्वे आंदेकर टोळीशी निगडित सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्यासह सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचा समावेश आहे. याशिवाय कुख्यात गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे तसेच गणेश कोमकर यांच्या पत्नी कल्याणी कोमकर, बापू नायर यांची नावेही या यादीत असल्याचे सूत्रांकडून समजते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com