Shiv Sena, BJP, Congress, NCP
Shiv Sena, BJP, Congress, NCP  sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : सॅटलाईट इमेजिंगच्या माध्यमातून होणार प्रभागांची सीमानिश्चिती

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभागरचनेच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी उपग्रहीय (Satellite) नकाशांच्या सहाय्याने प्रभागांची (Ward) सीमा निश्‍चित केली जाणार आहे. (Ward delimitation will be done through satellite imaging)

मुंबईत २२७ प्रभाग असून ९६ लाखांच्या आसपास मतदार आहेत. प्रत्येक प्रभागात ४० ते ५० हजारांच्या आसपास मतदार असतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रभागांची फेररचना करण्यात येत आहे. त्यासाठी मतदारांचे स्थलांतर आणि बदललेल्या भौगोलिक रचनेनुसार फेररचना केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निमयानुसार प्रभागरचना करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार वसाहती, इमारती आणि वस्त्या शक्यतो दोन प्रभागांत येऊ नये. नैसर्गिक मर्यादा प्रभागांची सीमा मानून नियोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या सूचनांनुसार उपग्रहीय नकाशांच्या आधारे सीमा निश्‍चित केल्या जातील. मात्र, त्यापूर्वी पाच वर्षांत झालेला पुनर्विकास आणि विकासामुळे झालेल्या प्रभागांतील मतदारांच्या स्थलांतरानुसार त्यांची संख्या निश्‍चित केली जाणार आहे. मात्र, जास्तीत जास्त ५० हजार मतदारांचा प्रभाग असेल, असे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रभागरचना आणि वाद

महापालिकेच्या २०१७ च्या प्रभागरचनेवर शिवसेनेसह काँग्रेसनेही आक्षेप घेतला होता. साधारण ३० ते ४० प्रभागांची रचना करताना नियम पाळण्यात आले नव्हते, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता नव्या प्रभागरचनेवरही आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT