Mumbai BEST bus crash Sarkarnama
मुंबई

Mumbai BEST Bus Crash : कुर्ल्यातील बसचा अपघात नेमका कशामुळे झाला? शिंदेंच्या आमदाराने सांगितलं कारण

Kurla BEST Bus Accident : कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात आतापर्यंत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर जवळपास 49 जण गंभीर जखमी आहेत. बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jagdish Patil

Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. सोमवारी रात्री (ता.09) एलबीएस मार्गावरील मार्केटमध्ये भरधाव वेगाने आलेल्या बेस्ट बसने आठ ते दहा वाहनांसह पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 49 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

तर हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची विविध कारणं समोर येत आहेत. अशातच आता कुर्ल्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) आमदार दिलीप लांडे यांनी काल रात्री घटनास्थळी भेट देत हा अपघात कशामुळे घडला? याबाबतची माहिती दिली आहे.

अपघाता संदर्भात माध्यमांशी बोलताना दिलीप लांडे यांनी सांगितलं की, "कुर्ला स्थानकाहून निघालेल्या बेस्ट बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे चालक अचानक घाबरला आणि त्याने ब्रेकच्या जागी एक्सलेटरवर पाय दिल्यामुळे बसचा वेग आणखी वाढला आणि बस अनियंत्रित झाली.

अनियंत्रित झालेल्या बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली." अशी प्राथमिक माहिती लांडे यांनी दिली. दरम्यान, या अपघातात आतापर्यंत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर जवळपास 49 जण गंभीर जखमी आहेत. बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसंच या बसध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता अशी धक्कादायक माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, बस चालक संजय मोरे हा कंत्राटाद्वारे नेमण्यात आल्याचंही आता सांगितलं जात आहे.

संजय मोरे 1 डिसेंबर रोजी कामावर रूजू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. शिवाय कंत्राटपदावर भरती झालेला चालक आधी खासगी बस चालवत होता. त्याला मोठ्या बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT