Ajit Pawar : आयकर विभागाकडून दिलासा पण अजितदादांवर ED चौकशीची टांगती तलवार कायम?

Ajit Pawar ED Investigation Case : अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचंच त्यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला होता.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 10 Dec : अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचंच त्यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला होता. आयकर विभागाकडून त्यांची जप्त केलेली जवळपास 1000 कोटींची मालमत्ता मुक्त करण्यात आली होती. याबाबतचे आदेश दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाला दिले होते.

अजितदादांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला होता तर दुसरीकडे राज्यातील राजकारण तापलं होतं. विरोधकांनी जे भाजपबरोबर (BJP) जातात त्यांना ईडी आणि आयकर विभागाकडून क्लीन चीट दिली जाते असा आरोप करण्यात आला. मात्र, आयकर विभागाकडून दिलासा मिळालेल्या अजितदादांच्या मागे ईडीचा फेरा कायम असल्याची माहिती समोर आली आहे.

कारण अजित पवारांची (Ajit Pawar) ईडी चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती साम टीव्हीला सुत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून अजित पवारांची सिंचन आणि सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची चौकशी बंद होणार नाही तर ती पुढे देखील अशीच सुरू राहणार आहे.

त्यामुळे त्यांच्यामागील ईडीचा त्रास कमी झाला नसल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय या प्रकरणी ईडीकडून अजितदादांना अद्याप क्लोजर रिपोर्टही मिळाला नसल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे. शिवाय आयकर विभागाने दिलासा दिलेल्या अजितदादांवर ईडीच्या चौकशीची टांगती तलवार कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar
Satish Wagh Murder Case: आमदार टिळेकरांचे मामा अपहरण अन् हत्या प्रकरण; पुणे पोलिसांनी दिली मोठी अपडेट

आयकर विभागाने क्लीन चीट दिलेलं नेमकं प्रकरण काय?

7 ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवारांच्या विविध मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकून त्यांची संपत्ती जप्त केली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबियांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर टाच आणून ती जप्त केली होती.

Ajit Pawar
Aditya Thackeray letter to CM Fadnavis: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवले पत्र अन् केली 'ही' मोठी मागणी, म्हणाले...

तसंच एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, याबाबत आपण नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाचे अपील फेटाळत त्यांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com