MNS| Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

MNS Gudi Padwa Melava: राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ?; आजच्या मेळाव्यात नेमकं काय बोलणार ?

Raj Thackeray Gudi Padwa Melava: कोणावर घणाघात करणार?

सरकारनामा ब्युरो

Shivaji Park: शिवाजी पार्कवर आज (22 मार्च) संध्याकाळी 6 वाजता मनसेचे अध्यक्ष राज (raj thackeray) ठाकरे यांची गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त जाहीर सभा होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. त्यातच सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणीही संपली आहे, ज्याचा निकाल कधीही येऊ शकतो, त्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण राजकारणाबाबत कोणती भूमिका घेणार आणि खास त्यांच्या शैलीत कोणावर घणाघात करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज ठाकरे कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावर ते काय बोलणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

आजच्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं मनसेचे कार्यकर्ते शिवाजी पार्ककडे रवाना झाले आहेत.

मनसेचा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी फारसं न बोलता, गुढीपाडवा मेळाव्यात सगळं बाहेर काढणार, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

गेल्यावर्षी मेळाव्यातून भोंग्याचा विषय गाजला होता. त्यामुळे यंदा कोणत्या मुद्द्यावरून ते राज्याच्या जनतेला संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या मेळाव्याचा टीजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समाज माध्यमावर शेअर केला आहे.

आगामी निवडणुका, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, पोटनिवडणुका, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील निकाल या सर्व मुद्द्यांवर राज ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यात झालेला सत्तासंघर्ष, शिवसेनेत पडलेली फूट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेले शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह, सत्ता संघर्षाची पूर्ण झालेली सुनावणी अर्थसंकल्पीय अधिवेशन, महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, आगामी निवडणूका असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे यातील कोणत्या मुद्द्यावरुन राज ठाकरे हे सरकारला घेरतील हे सांयकाळी समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT